शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

नक्षल बंदमुळे बसफेऱ्या प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 00:04 IST

२८ जुलैपासून नक्षल बंदला सुरूवात झाली आहे. नक्षल बंददरम्यान घातपाताच्या घटना घडण्याची शक्यता राहत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून दुर्गम भागात जाणाºया जवळपास १६ बसफेºया रद्द करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देएसटीचा खबरदारीचा उपाय : २८ जुलै ते ३ आॅगस्टपर्यंत नक्षल सप्ताह

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : २८ जुलैपासून नक्षल बंदला सुरूवात झाली आहे. नक्षल बंददरम्यान घातपाताच्या घटना घडण्याची शक्यता राहत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून दुर्गम भागात जाणाºया जवळपास १६ बसफेºया रद्द करण्यात आल्या आहेत. दरवर्षीच्या तुलनेत रद्द असलेल्या बसफेऱ्यांची संख्या कमी झाली आहे.२८ जुलै ते ३ आॅगस्ट दरम्यान नक्षलवाद्यांनी बंदचे आवाहन केले आहे. बंद यशस्वी करण्यासाठी नक्षल्यांकडून घातपाताच्या घटना घडवून आणून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळे गडचिरोली व अहेरी या दोन्ही आगारांनी दुर्गम व नक्षल प्रभावित भागात जाणाºया बसफेºया बंद ठेवल्या आहेत. गडचिरोली आगारातून जाणाºया कोटगूल, मानापूर, गोडलवाही, विकासपल्ली, गिलगाव, मालेवाडा, खांबाळा आदी बसफेºया अंशत: तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्यात आल्या आहेत. यातील काही बसफेºया शांत भागात असलेल्या गावापर्यंत जाऊन परत आणण्यात आल्या आहेत.अहेरी आगारातून सुटणाºया कसनसूर, जारावंडी, लाहेरी, गट्टा या बसफेºया रद्द झाल्या आहेत. या बसफेºया तालुकास्थळापर्यंत पाठविण्यात आल्या आहेत.बसफेºयांसोबतच खासगी वाहतूक सेवाही बंद ठेवण्यात आली होती. धानोरा येथील वाहतूक सेवा पूर्णपणे बंद होती. दुर्गम भागातील रोवणे सुध्दा बंद ठेवण्यात आले होते. पोलिसांच्या सतर्कतेमुळे नक्षल बंदच्या पहिल्या दिवशी कोणतीही अनुचित घटना घडली नाही.नक्षल बंदचा प्रभाव ओसरलानक्षल बंद दरम्यान घातपाताच्या घटना नक्षल्यांकडून घडविल्या जात असल्याने नागरिक स्वत:हून बंद पाळत असल्याचा आजपर्यंतचा अनुभव होता. मात्र यावर्षी नक्षल बंदचा फारसा प्रभाव दिसून आला नाही. नक्षल प्रभावित काही गावांमध्ये बंद पाळण्यात आला. तर काही गावातील तरूणांनी नक्षलवाद्यांचे बॅनर जाळून नक्षलवादी व बंदचा निषेध केला. तालुकास्तरावर तर बंदचा अजिबाद प्रभाव दिसून आला नाही.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी