शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बसची झाडाला धडक, नऊ जखमी

By admin | Updated: June 23, 2017 00:48 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवाशी बसचे स्टेअरिंग अचानक लॉक झाल्याने बसचालकाचे नियंत्रण सुटून बसची झाडाला धडक बसली.

लभाणतांडानजीकची घटना : स्टेअरिंग लॉक झाल्याने घडला अपघातलोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवाशी बसचे स्टेअरिंग अचानक लॉक झाल्याने बसचालकाचे नियंत्रण सुटून बसची झाडाला धडक बसली. या अपघातात बसमधील नऊ प्रवाशी जखमी झाले. सदर घटना आलापल्ली-चंद्रपूर मार्गावरील अहेरी तालुक्यातील लभानतांडा वळणावर गुरूवारी दुपारी २.५० वाजताच्या सुमारास घडली.एमएच-४०-वाय-५५८४ क्रमांकाची नागपूर आगाराची बस अहेरीवरून नागपूरसाठी अहेरी आगारातून दुपारी २.१५ वाजता निघाली. आलापल्लीपासून ४ किमी अंतरावर असलेल्या लभाणतांडा नजीकच्या वळणावर या बसचे स्टेअरिंग अचानक लॉक झाल्याने बसचालकाचे नियंत्रण सुटून बसची झाडाला जबर धडक बसली. नऊ प्रवाशी जखमी झाले. यामध्ये बसचालक एन. टी. टेंभरे (३५), बसवाहक विठ्ठल चव्हाण, प्रवाशी संदीप सिंग (३६) रा. हरियाणा, रंजना आलाम (३०), वसंत वलके (५८) रा. अहेरी, पर्वता चिट्टलवार (४०) रा. विठ्ठलवाडा, पोशक्का काटलू (८०) रा. सिरोंचा, लस्मय्या काटलू, माया टिपले रा. आलापल्ली आदींचा समावेश आहे. अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. त्रिवेंद्र कटरे हे घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. सर्व जखमींना सदर रुग्णवाहिकेने अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय उमाटे, डॉ. दीपक मुंडे यांनी जखमींवर उपचार केले. यापैकी पोशक्का काटलू यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना गडचिरोलीच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अहेरीचे नगरसेवक अमोल मुक्कावार यांनी रुग्णालयात जाऊन सर्व जखमींची भेट घेतली. बसचालक एन. के. टेंभरे यांनी प्रसंगावधान राखल्याने बसमधील प्रवाशी बचावले. धावत्या बसचे स्टेअरिंग लॉक झाल्यावर वेग कमी करून त्यांनी लभाणतांडाजवळ बस थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र यात बस न उलटता झाडावर आदळली. अहेरी आगाराचे लिपीक वामन चिप्पावार व चरण चहारे यांनी अहेरीच्या रुग्णालयात येऊन जखमी प्रवाशांची भेट घेतली. सर्व जखमींना एक हजार रूपयांची आर्थिक मदत महामंडळामार्फत करण्यात आली. या घटनेचा तपास सुरू आहे.