शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

बस डेपो, स्थानकाचे काम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 00:21 IST

सिरोंचा बस आगार व आलापल्ली बसस्थानक शासनाच्या वतीने मंजूर करण्यात आले आहे. यासाठी जागा व इतर अडचणी तत्काळ मार्गी लावून बस आगार व स्थानकाचे काम संबंधित यंत्रणेने लवकर हाती घ्यावे,

ठळक मुद्देपालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश : बैठकीत जागेच्या कार्यवाहीचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सिरोंचा बस आगार व आलापल्ली बसस्थानक शासनाच्या वतीने मंजूर करण्यात आले आहे. यासाठी जागा व इतर अडचणी तत्काळ मार्गी लावून बस आगार व स्थानकाचे काम संबंधित यंत्रणेने लवकर हाती घ्यावे, असे निर्देश राज्याचे आदिवासी विकास, वने राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.सिरोंचा बस आगार व आलापल्ली बसस्थानकाच्या कामाच्या कार्यवाहीबाबत आढावा घेण्यासाठी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी गडचिरोली येथे जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवारी बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते.सिरोंचा बस डेपो व आलापल्ली बस स्थानक हे दोन्ही विषय अहेरी विधानसभा मतदारसंघातील जनतेसाठी अत्यंत जिव्हाळ्याचे विषय आहेत, आणि हे दोन्ही विषय लवकरात लवकर मार्गी लागणे आवश्यक आहे, अशी भूमिका पालकमंत्र्यांनी घेतली आहे.गडचिरोलीपासून अहेरी-सिरोंचा येथील अंतर १०० किमीच्यावर आहे. तसेच सिरोंचा जवळून तेलंगणा व छत्तीसगड येथील सीमा लागते. आता गोदावरी, प्राणहिता, इंद्रावती या तिन्ही नद्यांवर मोठा पूल होत असल्याने सिरोंचा वरून या राज्यांकडे आंतरराज्यीय वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. त्यामुळे वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाला सिरोंचा येथे बस आगार व आलापल्ली हे विधानसभा क्षेत्रातील मध्यवर्ती ठिकाण असल्याने प्रवाशांच्या सोयीसाठी या ठिकाणी सुसज्ज बस स्थानक असणे आवश्यक आहे. तशी या भागातील लोकांची मागील अनेक वर्षांपासूनची मागणी होती. जनतेची ही मागणी लक्षात घेऊन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी सरकारकडे सातत्याने या दोन्ही विषयांचा पाठपुरावा केला होता. यात त्यांना यश आले असून विद्यमान राज्य सरकारने सिरोंचा बस डेपो व आलापल्ली बस स्थानकाला मंजुरी दिली आहे. सदर डेपो व बसस्थानकाच्या कामात जागा व इतर काही अडचणी आहेत, त्या तात्काळ सोडवून हे दोन्ही कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना बैठकीत केल्या. येत्या एक महिन्यात पुन्हा एक बैठक घेऊन या दोन्ही विषयांचा आढावा आपण घेणार असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीला राज्य परिवहन महामंडळ, वन विभाग, महसूल विभाग तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.तेलंगणकडे वाहतूक वाढणारसिरोंचा येथे बसडेपो झाल्यास येथून लगतच्या तेंलगणा राज्याकडे महाराष्ट्र महामंडळाच्या वतीने बसफेऱ्या सुरू करता येणार आहे. त्यानंतर जिल्ह्यातील अनेक प्रवाशांना तेलंगणा राज्याकडे आवागमन करण्यासाठी सोयीचे होणार आहे.