शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

बैलबंडीने आणावा लागला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 00:17 IST

येथून दोन किमी अंतरावर असलेल्या पद्देवाही टोला येथील सुमन बाबुराव मडावी (४०) या महिलेचा मृतदेह बुधवारी घराजवळच्या विहिरीत आढळून आला. शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रूग्णालयात नेण्यासाठी पैसे नसल्याने वाहन मिळाले नाही.

ठळक मुद्देकुटुंबीयांनी स्वत:च्या बैलबंडीत मृतदेह टाकून रूग्णालयापर्यंत आणला.

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : येथून दोन किमी अंतरावर असलेल्या पद्देवाही टोला येथील सुमन बाबुराव मडावी (४०) या महिलेचा मृतदेह बुधवारी घराजवळच्या विहिरीत आढळून आला. शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रूग्णालयात नेण्यासाठी पैसे नसल्याने वाहन मिळाले नाही. परिणामी तिच्या कुटुंबीयांनी स्वत:च्या बैलबंडीत मृतदेह टाकून रूग्णालयापर्यंत आणला. मात्र या ठिकाणीही शवविच्छेदन करणारे डॉक्टर नसल्याने सायंकाळी मृतदेह अहेरी रूग्णालयात हलवावा लागला.एटापल्ली तालुका आदिवासी बहूल आहे. या तालुक्यातील बहुतांश नागरिक हातावर आणून पानावर खातात. एखादेवेळी अनुचित घटना घडल्यास मृतदेह दवाखान्यापर्यंत नेण्यासाठी पैसे राहत नाही. त्यामुळे बऱ्याचवेळा मृतदेह बैलबंडीने आणण्याची नामुष्की ओढवते. त्यामुळे एटापल्ली तालुक्याला विशेष बाब म्हणून शववाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून होत आहे. यापूर्वी तुमरगुंडा येथील एका इसमाला मुलाचे प्रेत खांद्यावर घरी न्यावे लागले होते.शवविच्छेदनासाठी लागतात तीन दिवसदुर्गम भागातील नागरिक घटना घडल्याच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांकडे तक्रार करतात. पोलीस त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पंचनामा करतात. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह एटापल्ली येथे आणला जातो. याही ठिकाणी एमबीबीएस डॉक्टर नसल्यास मृतदेह अहेरीला हलवावा लागतो. या सर्व प्रक्रियेत तीन दिवस उलटून मृतदेहाची दुर्गंधी सुटते.