वैरागड येथे वीज वितरण कंपनीचे कार्यालय असून, या ठिकाणी एक कनिष्ठ अभियंता आणि आठ-दहा वर्षांपूर्वी २३ कर्मचारी कार्यरत होते; पण मागील १० वर्षांत या कार्यालयात कार्यरत काही कर्मचारी सेवानिवृत्त झाले, तर काहींची या ठिकाणाहून बदली झाली. त्या ठिकाणी दुसऱ्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्या नाहीत. या वीज मंडळ मंडळाच्या कार्यक्षेत्रात वैरागड, मोहझरी, सुकाळा, नागरवाही, शिवनी, मानापूर, देलनवाडी, मांगदा, कोसरी, कुलीकुली, पिसेवडधा, कुरडी, डोंगरतमासी, वडेगाव, मेंढा व भाकरोंडी परिसरातील अनेक गावांचा समावेश असून, प्रत्येक गावातील वीज ग्राहकांची मोठी संख्या, कृषी पंपधारक शेतकरी आणि वारंवार विजेचा लपंडाव, कमी विद्युत दाब यामुळे नागरिकांच्या बऱ्याच समस्या असतात. गावाप्रमाणे नेमून दिलेले वीज कर्मचारी हे ग्राहकांच्या तक्रारीनुसार तांत्रिक अडचणी पूर्ण करतात; पण वीज ग्राहक, कृषीपंपधारक शेतकऱ्यांना आपल्या अडचणी सोडविण्यासाठी आरमोरी कार्यालयात पायपीट करावी लागत आहे.
१० कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर ५० गावांचा भार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:39 IST