शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

खोलीकरण करून नदीत उभारला बंधारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 00:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्थानिक नगर पालिका प्रशासनाने वैनगंगा नदीवर नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली असून बोरमाळा नदी घाटावर पाणी टाकी उभारण्यात आली आहे. मात्र नदीची पाणी पातळी खालावल्याने गेल्या २० ते २५ दिवसांपासून शहरात अत्यल्प पाणी पुरवठा होत होता. पाण्याचा प्रवाह विरूध्द दिशेला गेल्याने अनेक कुटुंबांना नळाचे पाणी ...

ठळक मुद्देशहरातील पाणी टंचाईवर उपाययोजना : नव्या पाणी पुरवठा सभापतींचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्थानिक नगर पालिका प्रशासनाने वैनगंगा नदीवर नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली असून बोरमाळा नदी घाटावर पाणी टाकी उभारण्यात आली आहे. मात्र नदीची पाणी पातळी खालावल्याने गेल्या २० ते २५ दिवसांपासून शहरात अत्यल्प पाणी पुरवठा होत होता. पाण्याचा प्रवाह विरूध्द दिशेला गेल्याने अनेक कुटुंबांना नळाचे पाणी मिळत नव्हते. याबाबीची दखल घेत नवे पाणी पुरवठा सभापती प्रविण वाघरे यांनी नदी पात्रात जाऊन पाहणी केली व पाणी टंचाईची समस्या मार्गी लावली.शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वैनगंगा नदीच्या पात्रातील पाण्याचा प्रवाह विरूध्द दिशेने गेला होता. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होत नव्हता. याची दखल घेत पाणी पुरवठा सभापती प्रविण वाघरे यांनी न.प.कर्मचाऱ्यांसह नदी पात्रात जाऊन पाहणी केली. यावेळी नदीचे पात्र कोरडे झाल्याचे आढळून आले. तत्काळ पोकलँड मशीन बोलावून नदी पात्रातील इन्टेक वेलजवळ खोलीकरण करण्यात आले. तसेच सिमेंटच्या रिकाम्या पिशव्यांमध्ये रेती भरून बंधारा बांधण्यात आला. यामुळे नदी पात्रात पाणी पातळी वाढली असल्याने शहराला आता सुरळीत व पुरेसा पाणी पुरवठा होणार आहे, अशी माहिती पालिकेचे पाणी पुरवठा सभापती वाघरे यांनी लोकमतशी बोलताना दिली.नदी पात्रात पाहणी करताना नगरसेवक भुपेश कुळमेथे यांच्यासह पाणी पुरवठा विभागाचे सोनटक्के व इतर कर्मचारी उपस्थित होते. उन्हाळ्यातही पाणी टंचाई जाणवणार नाही. याची काळजी घेण्याचे निर्देश सभापती वाघरे यांनी त्यांना दिले.