शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

देसाईगंजच्या मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमणांवर चालला बुलडोझर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2022 05:00 IST

नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या नेतृत्वात महसूल विभाग, भूमी अभिलेख विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग व पोलीस विभाग या पाच विभागांच्या संयुक्त  विद्यमाने मुख्य बाजारपेठेतील थोरात चौक ते फवारा चौक ते भारतीय स्टेट बँक ते दुर्गामाता मंदिर ते जुनी महात्मा गांधी शाळा ते आयडीबीआय ते फवारा चौक या मार्गावरील अतिक्रमण काढण्यात आले.

लाेकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : स्थानिक नगरपरिषद प्रशासनाच्यावतीने २५ मे राेजी बुधवारला शहरातील मुख्य महामार्गावर रस्त्यालगतचे कच्चे व पक्के अतिक्रमण बुलडोझरच्या सहायाने हटविण्यात आले. या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे शहरातील अतिक्रमणधारकांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.  ही मोहीम गुरुवारला देखील चालूच राहणार असल्याने अनेकांनी आपले अतिक्रमण स्वतः काढण्यास सुरुवात केली आहे.नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या नेतृत्वात महसूल विभाग, भूमी अभिलेख विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग व पोलीस विभाग या पाच विभागांच्या संयुक्त  विद्यमाने मुख्य बाजारपेठेतील थोरात चौक ते फवारा चौक ते भारतीय स्टेट बँक ते दुर्गामाता मंदिर ते जुनी महात्मा गांधी शाळा ते आयडीबीआय ते फवारा चौक या मार्गावरील अतिक्रमण काढण्यात आले.सदर अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार आश्रमा, कार्यालय अधीक्षक महेश गेडाम, नगरविकास विभागप्रमुख दानिशोद्दीन काझी, बांधकाम अभियंता साई कोंडलेकर, नायब तहसीलदार बेहरे, पोलीस निरीक्षक महेश मसराम, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे, सुजाता भोपळे, सोनम नाईक आदी उपस्थित होते.अतिक्रमणधारकांनी माेकळ्या जागेत पुन्हा ‘जैसे थे’ बांधकाम केल्यास त्या बांधकामांची मोजणी करून मंजूर नकाशानुसार बांधकाम ठेवून अतिरिक्त बांधकाम पाडण्यात येईल, असे मुख्याधिकारी विजय कुमार आश्रमा यांनी सांगितले. या कारवाईचे अनेकांनी स्वागत केले. 

राष्ट्रीय महामार्गावर कारवाई होणार-    साकोली-वडसा -आरमोरी  ३५३ ही या  राष्ट्रीय महामार्गालगत देसाईगंज शहरातील मुख्य रस्त्यावरील अस्थायी पट्टेधारकांसह लहान-मोठे अतिक्रमणधारकांना  अनुसूची ३ नियम ११ नुसार अनधिकृत कब्जा हटविण्याबाबत सूचनेतील राष्ट्रीय राजमार्ग नियंत्रण ( भूमी आणि वाहतूक) अधिनियम २००२ मधील नियम २६ ची उपकलम (२) च्या अधीन राहून उपविभागीय  अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग भंडारा यांनी २० मे राेजी नोटीस बजावली. त्यानंतर अतिक्रमणधारक चांगलेच धास्तावले आहेत. तथापि राष्ट्रीय महामार्गाचे वरिष्ठ अधिकारी मंगळवारपासून डेरेदाखल झाले असल्याने राष्ट्रीय महामार्गावर कारवाई होणार असल्याचे संकेत दिले आहेत. 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण