शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सिरोंचात अतिक्रमणावर चालला बुलडोजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 00:24 IST

स्थानिक नगर पालिकेच्या हद्दीतील क्रीडा संकूल परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजुला खुल्या जागेवर अतिक्रमण करून अनेकांनी टिनाचे शेड उभारून व्यवसाय सुरू केला होता. संबंधित अतिक्रमणधारकांना नोटीस पाठवूनही प्रतिसाद न दिल्याने अखेर नगर पंचायत प्रशासनाने मंगळवारी बुलडोजर, जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यालगतचे अतिक्रमण काढले.

ठळक मुद्देनगर पंचायतीची कारवाइ : नोटिशीला प्रतिसाद न दिल्याने व्यावसायिकांना दणका

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : स्थानिक नगर पालिकेच्या हद्दीतील क्रीडा संकूल परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजुला खुल्या जागेवर अतिक्रमण करून अनेकांनी टिनाचे शेड उभारून व्यवसाय सुरू केला होता. संबंधित अतिक्रमणधारकांना नोटीस पाठवूनही प्रतिसाद न दिल्याने अखेर नगर पंचायत प्रशासनाने मंगळवारी बुलडोजर, जेसीबीच्या सहाय्याने रस्त्यालगतचे अतिक्रमण काढले.येथील क्रीडा संकुल परिसरात राज्य मार्गाच्या दोन्ही बाजूलगत खुल्या जागेवर कोणतीही परवानगी न घेता ११ व्यावसायिकांनी टिनाचे शेड उभारून व्यवसाय सुरू केला होता. नगर पंचायत प्रशासनाने दोन महिन्यांपूर्वी या व्यावसायिकांना अतिक्रमणाबाबत नोटीस बजाविली होती. अतिक्रमण काढण्याचे निर्देश दिले होते. मात्र व्यावसायिकांनी या नोटीसची दखल घेतली नाही. मंगळवारी सकाळच्या सुमारास चोख पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्यात आले. नगर पंचायत प्रशासनाची ही कारवाई पाहून ११ पैकी ७ व्यासायिकांनी स्वत: पुढाकार घेऊन रस्त्यावरील अतिक्रमण काढले.चार व्यावसायिकांचे अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने काढून साहित्य नगर पंचायतीत जमा करण्यात आले, अशी माहिती नगर पंचायतीचे मुख्याधिकारी दिक्षांत देशपांडे यांनी लोकमतशी बोलतांना दिली. यापुढेही अतिक्रमण हटविणे सुरूच राहणार असून कोणताही गवगवा न करता ही मोहीम राबविणार असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.नगर पंचायत प्रशासनाने सदर अतिक्रमण हटाव मोहीम राबविल्याने क्रीडा संकुल परिसरातील दोन्ही बाजुकडील रस्ते आवागमनासाठी आता मोकळे झाले आहेत. नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण