शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

देसाईगंज शहरातील अतिक्रमणावर चालला बुलडोजर

By admin | Updated: May 5, 2017 01:09 IST

रेल्वे स्थानकावरील भूमिगत पुलाच्या अ‍ॅप्रोच रस्त्याला लागून असलेले अतिक्रमण काढावे, अशा सूचना रेल्वे विभागाने

रेल्वे विभागाची कारवाई : भूमिगत पुलाच्या अ‍ॅप्रोच रस्त्यालगतचे अतिक्रमण काढताना अतिरिक्त कुमक बोलाविली देसाईगंज : रेल्वे स्थानकावरील भूमिगत पुलाच्या अ‍ॅप्रोच रस्त्याला लागून असलेले अतिक्रमण काढावे, अशा सूचना रेल्वे विभागाने अतिक्रमणधारकांना देऊनही अतिक्रमण काढले नव्हते. अखेरीस रेल्वे विभागाने कारवाई करीत ४ मे रोजी सकाळी ११ वाजतापासून बुलडोजरच्या सहाय्याने अतिक्रमण काढण्यास सुरूवात केली. रेल्वे क्रॉसिंगमुळे देसाईगंज शहराचे दोन विभागात विभाजन झाले आहे. एका भागात रहिवासी आहेत तर दुसऱ्या भागात बाजारपेठ आहे. परिणामी नागरिकांना बाजारपेठेत जावेच लागते. शहराच्या मधोमध दक्षिण पूर्व मध्य रेल्वेची लाईन गेली आहे. या मार्गावरून दिवसातून १० ते १२ प्रवाशी व मालवाहतूक रेल्वेगाड्या धावतात. तेवढ्या वेळा या ठिकाणची रेल्वे फाटक बंद केली जाते. परिणामी नागरिकांना रेल्वे फाटकावरच ताटकळत बसावे लागते. ही बाब शहरवासीयांसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. भूमिगत रेल्वे पुलाच्या अ‍ॅप्रोच रस्त्याला लागून अतिक्रमण वाढले आहे. सदर अतिक्रमण काढण्यात यावे, याबाबतची नोटीस दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागभिड येथील सेक्शन इंजिनिअर यांनी २७ एप्रिल रोजी १९ अतिक्रमणधारकांना बजाविली होती. सदर अतिक्रमण सात दिवसाच्या आत काढावे, असे नोटीसमध्ये बजाविण्यात आले होते. मात्र अतिक्रमणधारकांनी स्वत:हून अतिक्रमण काढले नाही. त्यामुळे रेल्वे विभागाने कारवाईचा बडगा उगारला. अतिक्रमण हटविताना रेल्वे पोलीस बलाला पाचारण करण्यात आले होते. सहायक विभागीय अभियंता ए. के. पांडेय यांच्या नेतृत्वात अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. रेल्वे अभियंता विभागाचे १५ अधिकारी, कर्मचारी, रेल्वे विद्युत विभागाचे दोन कर्मचारी, रेल्वे सुरक्षा बलाचे २५ अधिकारी, देसाईगंज पोलीस स्टेशन, नगर पालिकेचे कर्मचारी तैनात करण्यात आले होते. बुलडोजर लावून अतिक्रमण हटविण्यात आले. सदर अतिक्रमण हटविण्याची कारवाई रेल्वे पोलीस ठाणे प्रभारी आर. वाय. ठाकूर, रेल्वे सुरक्षा बलाचे प्रभारी जी. एफ. ठारफल, बांधकाम अभियंता बी. साहू यांच्या नेतृत्वात करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)