शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

मेंढात बंधाऱ्याचे बांधकाम निकृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 00:35 IST

तालुक्यातील मेंढा येथे बंधाऱ्याचे बांधकाम केले जात आहे. मात्र सदर बांधकाम अतिशय निकृष्ट आहे. साध्या हातानेही सिमेंट व गिट्टी उकरून काढता येते. यावरून बांधकामाचा दर्जा किती खराब आहे, याचा प्रत्यय येते.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तालुक्यातील मेंढा येथे बंधाऱ्याचे बांधकाम केले जात आहे. मात्र सदर बांधकाम अतिशय निकृष्ट आहे. साध्या हातानेही सिमेंट व गिट्टी उकरून काढता येते. यावरून बांधकामाचा दर्जा किती खराब आहे, याचा प्रत्यय येते. विशेष म्हणजे निकृष्ट दर्जाचे बांधकाम होत असताना ग्रामसेवक व सरपंच हे चुप्पी साधून आहेत. यावरून या बांधकामात या दोघांचाही वाटा असल्याची शक्यता नाकारता येत नाही. निकृष्ट बांधकामाची चौकशी करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी सिंचन विभागाचे उपविभागीय अभियंता यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी शासनाने सिंचन बंधारा मंजूर केला आहे. यासाठी जवळपास १५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मागील एक महिन्यापासून बंधाऱ्याचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. मात्र सदर बंधारा अतिशय निकृष्ट दर्जाचा बांधला जात आहे. बंधाºयाचा सध्याचा दर्जा लक्षात घेतला तर यावर पाचही लाख रुपये खर्च होतील की नाही, याबाबत शंका आहे. बंधाऱ्यासाठी नाल्यातीलच मातीमिश्रीत गिट्टी वापरली जात आहे. सिमेंटही वेगळ्याच कंपनीचे वापरले जात आहे. तक्रार करणाऱ्या शेतकऱ्याने सर्वप्रथम बांधकामाची पाहणी केली. खाली टाकलेले बेडकाँक्रिट साध्या हातानेही उकरून निघत आहे. बांधकामाचा दर्जा एवढा निकृष्ट असल्याने हा बंधारा पावसाळ्यात टिकेल काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या कामावर मेंढा ग्रामपंचायतीचे उपसरपंच यांची ट्रॅक्टर व इतर साहित्य वापरले जात आहेत. याचा अर्थ सदर काम उपसरपंचच करीत असावे. फक्त कागदोपत्री ग्रामपंचायत करीत असल्याचे दाखविले जात आहे.उपसरपंचाच्या ट्रॅक्टरने नाल्यातील रेतीचा उपसा करून या रेतीचा वापर बंधाऱ्यासाठी केला जात आहे. रेतीचा उपसा झाल्याने नाल्यामध्ये मोठा खड्डा पडला आहे. याच नाल्यामधून शेतकरी आपल्या शेतात जातात. खड्डा पडल्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. हे सर्व निकृष्ट काम ग्रामसेवक व उपसरपंच यांच्या मनमर्जीने सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या कामाची चौकशी करून काम थांबविण्यात यावे, अन्यथा हे काम पुढे चालू राहिल्यास शासनाचे सुमारे १५ लाख रुपये वाया जाण्याची शक्यता आहे. तक्रार अर्जावर मेंढा येथील शेतकरी गजानन भुरले, तुळशिदास भैसारे, नीलेश धोडरे, नंदाजी भुरले, सुधीर भुरले, रमेश भुरले, मारोती चलाख यांनी केली आहे.ग्रामसेवक व उपसरपंचाची मिलीभगतसदर कामावर उपसरपंचाचे साहित्य वापरले जात आहेत. यावरून सदर काम उपसरपंचच करीत असल्याचे दिसूून येत आहे. यातील काही मलाई ग्रामसेवकालाही मिळणार असल्याने ग्रामसेवकही चुप्पी साधून आहे. निकृष्ट दर्जाच्या बांधकामाला गावकऱ्यांनी विरोध केल्यानंतरही बांधकाम बंद न ठेवता पुढे रेटले जात आहे. विशेष म्हणजे या बांधकामासाठी चोरीची रेती वापरण्यात आली आहे. ज्या ट्रॅक्टरने रेतीची चोरी झाली आहे, त्या ट्रॅक्टरवर महसूल विभागाने नियमानुसार १ लाख १३ हजार रुपयांचा दंड ठोठावावा. तसेच जेवढ्या रेतीचा उपसा झाला आहे, तेवढ्या रेतीचे मोजमाप करून तेवढी रक्कम कंत्राटदाराकडून वसूल करावी. तसेच ज्या ठिकाणी खड्डा तयार झाला आहे, सदर खड्डा कंत्राटदारानेच बुजवून द्यावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी मेंढा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक छगन खुणे यांना संपर्क साधला असता, त्यांचा भ्रमणध्वनी संच बंद असल्याचा शाब्दिक संदेश येत होता.