शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
7
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
8
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
9
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
10
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
11
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
12
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
13
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
14
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
15
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
16
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
17
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
18
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
19
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

विजेच्या शॉकने मारलेल्या म्हशी जमिनीत पुरल्या

By admin | Updated: April 8, 2015 01:08 IST

चामोर्शी पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या नवेगाव (रै.) येथील शेतकरी गोपाळा जिमना बुरांडे यांच्या मालकीच्या दोन म्हशी तांबाशी येथील आदर्श पुरस्कार प्राप्त शेतकरी ....

तळोधी (मो.) : चामोर्शी पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या नवेगाव (रै.) येथील शेतकरी गोपाळा जिमना बुरांडे यांच्या मालकीच्या दोन म्हशी तांबाशी येथील आदर्श पुरस्कार प्राप्त शेतकरी गणपती सातपुते यांच्या मकईच्या शेतात विजेचा शॉक लागून मरण पावल्या. त्यानंतर सातपुते यांनी या घटनेची कुठेही वाच्छता होऊ नये म्हणून शेतातच मोठे दोन खड्डे खोदून त्या म्हशी जमिनीत पुरल्या. यासंदर्भात तक्रारीनंतर चामोर्शी पोलिसांनी गणपती सातपुते यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून सोमवारी रात्री ७ वाजता अटक केली.नवेगाव (रै.) येथील गोपाळा बुरांडे यांच्याकडे सात एकर शेती असून त्यांनी दुग्ध उत्पादनासाठी दोन म्हशीही पाळल्या होत्या. या म्हशी घेऊन गोपाळा बुरांडे २९ मार्च रोजी शेतामध्ये चारण्यासाठी गेले होते. यावेळी म्हशींसोबत बैलजोडीही होती. बुरांडे हे शेतीकामात व्यस्त असताना दोन्ही म्हशी तांबाशी गावाकडे चरत-चरत गेल्या. मात्र आपल्या म्हशी कुनघाडा गावाकडे गेल्या असाव्या, असा तर्क झाल्याने बुरांडे कुटुंब म्हशीचा शोध घेण्यासाठी कुनघाडा येथे गेले. तेथे म्हशी कुणाला दिसल्या का? म्हणून त्यांनी लोकांकडे चौकशी केली. मात्र म्हशींचा पत्ताही लागला नाही. त्यानंतर सलग ५ एप्रिलपर्यंत बुरांडे कुटुंबाकडून म्हशीचा शोध सुरूच होता. मात्र यादरम्यान काही नागरिकांकडून सदर म्हशी उद्यानपंडीत पुरस्कार प्राप्त शेतकरी गणपती सातपुते यांच्या नदीशेजारी असलेल्या मकईच्या शेतात विद्युत शॉकने मरून पडल्या व त्या त्यांनी शेतातच खड्डा करून पुरल्या, अशी माहिती बुरांडे कुटुंबीयांना मिळाली. त्यानंतर बुरांडे कुटुंबीयांनी सातपुते यांच्या शेतात जाऊन पाहणी केली असता, मेलेल्या म्हशींचा प्रचंड दुर्गंध परिसरात पसरला होता. त्यानंतर गोपाळा बुरांडे यांनी चामोर्शी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी सोमवारी रात्री गणपती सातपुते याला अटक केली आहे. सातपुते याच्या विरोधात भादंविच्या ४२९, २०१ व महाराष्ट्र राज्य विद्युत बोर्ड अ‍ॅक्टअंतर्गत १३५ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. गोपाळा बुरांडे यांच्या दोन दुभत्या म्हशी विद्युत शॉकने मेल्यामुळे त्यांचे किमान एक लाख रूपयांचे नुकसान झाले असून शासनाने नुकसानभरपाई द्यावी व सातपुते यांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी गोपाळा बुरांडे यांनी केली आहे. (वार्ताहर)