शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेला मजबूत करणारा अर्थसंकल्प

By admin | Updated: February 26, 2016 01:52 IST

केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी गुरूवारी संसदेत सादर केलेल्या रेल्वे अर्थसंकल्पावर जिल्ह्यात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहे.

जिल्ह्यातील मान्यवरांच्या प्रतिक्रिया : निधीची तरतूद न झाल्याने रेल्वे मार्गाचे काम रखडेल

गडचिरोली : केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी गुरूवारी संसदेत सादर केलेल्या रेल्वे अर्थसंकल्पावर जिल्ह्यात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहे. वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद होणे आवश्यक होते. परंतु केवळ घोषणाबाजीच सुरू आहे. निधीचा पत्ता नाही, अशीही टीका काँग्रेसने केली आहे. तर हा अर्थसंकल्प रेल्वेला मजबूत करणारा असल्याचे खा. अशोक नेते यांनी म्हटले आहे.रेल्वे अर्थसंकल्प गतवर्षीच्या अर्थसंकल्पाला पुढे नेणारा व भारतीय रेल्वेला खऱ्या अर्थाने मजबुतीकरणाकडे नेणारा आहे. या रेल्वे अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आदिवासी, दलित, ओबीसी या सर्व समाज घटकांचा विचार करण्यात आला आहे. देशाच्या दुर्गम, अतिदुर्गम भागात रेल्वे विस्ताराचे कामही विचारात घेण्यात आले आहे. दररोज सात किमी लांबीचे मार्ग उभारणीचे उद्दिष्ट ठेवून रेल्वे वाटचाल करणार असल्याचे रेल्वे मंत्र्यांनी घोषित केल्यामुळे प्रलंबित असलेले व गतवर्षीच्या अर्थसंकल्पात ८० कोटी रूपयांचा निधी मिळालेल्या वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गालाही गती मिळेल, असा विश्वास खा. अशोक नेते यांनी या रेल्वे अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया नोंदविताना व्यक्त केला. नव्या रेल्वे गाड्या जरी सुरू केल्या नसल्या तरी रेल्वेस्थानकाच्या फलाटाची उंची वाढविणे, मोठ्या रेल्वे स्थानकावर फूट ओव्हर ब्रिज बांधणे आदी कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. यामुळे गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघातील सर्व रेल्वेस्थानकाच्या विकास कामांना गती मिळेल, असेही खा. नेते म्हणाले.