शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
3
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
4
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
5
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
6
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
7
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
8
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
9
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
10
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
11
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
12
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
13
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
14
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
15
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
16
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
17
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
18
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
19
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
20
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!

अर्थसंकल्प जिल्ह्यासाठी लाभदायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 23:21 IST

अर्थसंकल्पात कृषी,सिंचन, पायाभूत सुविधा यांच्यावर विशेष तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे सदर अर्थसंकल्प गडचिरोली जिल्ह्यासाठी विशेष लाभदायक .....

ठळक मुद्देखासदारांची माहिती : सिंचनाची सुविधा वाढण्यास होणार मदत

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : अर्थसंकल्पात कृषी,सिंचन, पायाभूत सुविधा यांच्यावर विशेष तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे सदर अर्थसंकल्प गडचिरोली जिल्ह्यासाठी विशेष लाभदायक असल्याची माहिती खासदार अशोक नेते यांनी पत्रकार परिषदेत दिली.अर्थसंकल्पात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. यामध्ये कृषीपंपांना विद्युत जोडणी देण्यासाठी ७५० कोटी रूपयांची तरतूद केली आहे. कृषी व अन्न प्रक्रिया योजनेसाठी ५० कोटी, वनशेतीला प्रोत्साहन देण्यासाठी १५ कोटी, फलोत्पादन योजनेचा विस्तार करण्यासाठी आर्थिक तरतूद केली आहे. राज्य परिवहन महामंडळामार्फत शेतमालाची वाहतूक करता येणार असल्याने शेतकऱ्यांसाठी सोयीचे झाले आहे. दारिद्र्य रेषेखालील शेतकऱ्यांना अन्न, धान्याचा लाभ देण्यासाठी ९२२.६८ कोटींची तरतूद केली आहे. जलसिंचन विभागासाठी ८ हजार २३३ कोटींची तरतूद आहे. यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील अपूर्ण राहिलेल्या बंधाºयांचे काम पूर्ण होण्यास मदत होणार आहे. जलयुक्त शिवार अभियानासाठी १ हजार ५०० कोटी, विहीर, शेततळे यासाठी १६० कोटी रूपयांची तरतूद केली आहे. महाराष्ट्रात नोकऱ्या उपलब्ध व्हाव्या ही बाब लक्षात घेऊन कौशल्य विकास, नवीन उपक्रम आणि उद्योजकता आदी उपक्रम राबविले जाणार आहेत. रस्ते विकासासाठी १० हजार ८२८ कोटींची तरतूद केली आहे. या सर्व बाबींचा गडचिरोली जिल्ह्यालाही लाभ होणार आहे, अशी माहिती खासदार अशोक नेते यांनी दिली. पत्रकार परिषदेला जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, पं.स. उपसभापती विलास दशमुखे, गडचिरोली शहर प्रमुख सुधाकर येनगंधलवार, गजानन येनगंधलवार, अविनाश विश्रोजवार, अनिल पोहणकर, माजी जि. प सदस्य प्रशांत वाघरे, श्रीकृष्ण कावनपुरे, प्रशांत भृगुवार, अनुसूचित जाती आघाडीचे डी. के. मेश्राम आदी उपस्थित होते.