शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

बीएसएनएलची सेवा कोलमडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 00:05 IST

केंद्र सरकार ‘डिजीटल इंडिया’चे स्वप्न पाहात असताना सरकारच्या अखत्यारित काम करणारी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ही कंपनी मात्र आपल्या बोगस सेवेने सरकारच्या योजनांना धुळीस मिळवत आहे.

अधिकाºयांची टोलवाटोलवी : कुणाचा पायपोस कुणात नाहीलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : केंद्र सरकार ‘डिजीटल इंडिया’चे स्वप्न पाहात असताना सरकारच्या अखत्यारित काम करणारी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ही कंपनी मात्र आपल्या बोगस सेवेने सरकारच्या योजनांना धुळीस मिळवत आहे. गेल्या दोन दिवसांपासून गडचिरोली शहरातील काही भागासह जिल्ह्यातही अनेक ठिकाणी बीएसएनएलची ब्रॉडबँड इंटरनेट सेवा विस्कळीत झाली आहे.सध्या प्रत्येक गोष्टीसाठी आॅनलाईन राहण्याचा सल्ला सरकार देत आहे. अनेक सेवा तर केवळ आॅनलाईनच उपलब्ध आहेत. मात्र इंटरनेट सुविधाच ठप्प पडल्यानंतर आॅनलाईन सेवेचा लाभ घ्यावा तरी कसा? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. विशेष म्हणजे वारंवार ठप्प होणाºया इंटरनेट सेवेसाठी कोण जबाबदार आहे, नेमका कुठे तांत्रिक बिघाड आहे हेसुद्धा बीएसएनएलच्या अधिकाºयांना आणि कर्मचाºयांना सापडत नाही.जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणचे लँडलाईन टेलिफोन नंबर बंद पडलेले आहेत. यात अनेक सरकारी कार्यालयांसोबत पोलीस ठाण्यांचेही फोन बंद आहेत. पोलीस विभाग बीएसएनएलकडे एक वेळ तक्रार करून मोकळे होतात, पण नंतर तो दुरूस्त होईलपर्यंत कोणताही फॉलोअप घेतला जात नाही. त्यामुळे टेलिफोनच्या माध्यमातून नागरिकांचा पोलिसांशी संवाद सुलभ होण्याशी बीएसएनएल कंपनीलाच नाही तर पोलिसांनाही काही सोयरसुतक नाही की काय, असा प्रश्न ग्रामीण भागातील नागरिक विचारत आहेत.पोलीस कंट्रोल रुमचा नंबर अद्याप बंदचजिल्ह्यात कुठेही कोणाला पोलीस मदतीची गरज पडली किंवा एखादी महत्वपूर्ण माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवायची असेल तर त्यासाठी ‘१००’ हा क्रमांक डायल केला जातो. हा टेलिफोन नंबर पोलीस कंट्रोल रूममध्ये असतो. मात्र गडचिरोली पोलिसांच्या कंट्रोल रूममधील हा महत्वाचा फोन नंबर गेल्या सहा महिन्यांपासून बंद आहे. यासंदर्भात पोलिसांकडे विचारणा केली असता बीएसएनएलकडे वारंवार तक्रारी करूनही त्यांनी दुरूस्ती केली नसल्याचे सांगण्यात आले. यावरून बीएसएनएलचा कारभार किती अनियंत्रित झाला याची कल्पना येते.