शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

बीएसएनएल सेवा चौकीदाराच्या भरवशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 23:13 IST

भामरागड येथील दूर संचार विभागाच्या कार्यालयात एकही कर्मचारी किंवा अभियंता नाही.

ठळक मुद्देकार्यालय नावापुरतेच : तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यास ग्राहकांची अडचण

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : भामरागड येथील दूर संचार विभागाच्या कार्यालयात एकही कर्मचारी किंवा अभियंता नाही. या कार्यालयाचा कारभार चौकीदाराच्या भरवशावर सुरू आहे. त्यामुळे काही तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यास तो दुरूस्त होत नसल्याने मोबाईलधारक कमालीचे त्रस्त आहेत.भामरागड तहसील कार्यालयातील ब्राडबँड सेवा मागील दोन ते तीन दिवसांपासून बंद पडली. त्यामुळे वरिष्ठ स्तरावर माहिती पाठविण्यास अडचण निर्माण होत होती. परिणामी नायब तहसीलदार कोकोडे यांना कार्यालयीन काम सोडून हेमलकसा येथे जावे लागले. बीएसएनएलच्या वतीने भामरागड तालुक्यात अनेक ठिकाणी टॉवर उभे केले आहे. सदर टॉवर थ्री-जी असल्याचे बीएसएनएल विभागाचे म्हणणे आहे. मात्र सदर टॉवर टू-जीचीही इंटरनेट स्पीड देत नाही. बºयाचवेळा फोन सुध्दा लागत नाही. त्यामुळे नागरिक व पोलीस विभागाचे कर्मचारी कमालीचे त्रस्त झाले आहेत. भामरागड येथे एकही पद भरले नसल्याने अहेरी येथील कर्मचारी त्रस्त आहेत. अनेक वेळा तक्रार केल्यानंतर एखादा कर्मचारी भामरागड येथे पाठविल्या जाते.पूर्वी केवळ हेमलकसा येथे टॉवर होते. आता मात्र एलडब्ल्यूई योजनेंतर्गत केंद्र शासनाने जवळपास १० टॉवर बांधले आहेत. या टॉवरच्या देखभाल व दुरूस्तीसाठी भामरागड येथे स्वतंत्र कार्यालय असणे आवश्यक आहे. मात्र याकडे बीएसएनएल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.चौकीदारच निभावतो अभियंत्याची भूमिकाभामरागड येथे एकही अभियंता किंवा तांत्रिक कर्मचारी नाही. त्यामुळे बीएसएनएल टॉवरच्या देखरेखीसाठी ठेवण्यात आलेल्या चौकीदारालाच काही तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यास नागरिक बोलवितात. इकडे तिकडेचे वायर जोडून ब्रॉडबँड सुरू करण्याचा प्रयत्न केला जातो.