शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

बीएसएनएल अधिकाऱ्यांचे धरणे

By admin | Updated: November 12, 2016 02:20 IST

बीएसएनएलमधील सात अधिकाऱ्यांचे स्थानांतरण झज्ञले असतानाही त्यांना रिलीव्ह करण्यात आले नाही.

स्थानांतरण थांबले : दूरसंचार निगम एक्झिक्युटिव्ह असोसिएशनचा पुढाकारगडचिरोली : बीएसएनएलमधील सात अधिकाऱ्यांचे स्थानांतरण झज्ञले असतानाही त्यांना रिलीव्ह करण्यात आले नाही. जिल्हा अभियंता सय्यद इलीयासुद्दीन यांनी खोटी माहिती वरिष्ठ स्तरावर सादर केली आहे, असा आरोप करीत दूरसंचार निगम एक्झिक्युटिव्ह असोसिएशन या अधिकारी संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी शुक्रवारी कॉम्प्लेक्स येथील बीएसएनएलच्या मुख्य कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. गडचिरोली येथे दोन वर्ष सेवा केली असता, अधिकाऱ्यांच्या आवडीच्या ठिकाणी त्यांची बदली केली जाते. त्यामुळे काही अधिकारी गडचिरोली येथे सेवा देण्यास तयार होतात. सात अधिकाऱ्यांचे स्थानांतरण मागील अनेक महिन्यांपासून झाले आहे. त्यांच्या जागी दुसरे अधिकारी रूजूसुद्धा झाले आहेत. तरीही जिल्हा अभियंता सय्यद इलीयासुद्दीन यांनी मुंबई सर्कल आॅफिसला चुकीची माहिती दिली. त्यामुळे या सात अधिकाऱ्यांचे अजुनपर्यंत स्थानांतरण झाले नाही. प्रशासनाला अनेक विनंत्या करूनही त्यांना सोडण्यात आले नाही. हा बीएसएनएल अधिकाऱ्यांवर होत असलेला अन्याय आहे. अशा प्रकारे अन्याय झाल्यास गडचिरोली जिल्ह्यात सेवा देण्यास अधिकारी तयार होणार नाही. जिल्हा अभियंता इलीयासुद्दीन यांचे एक वर्षापासून स्थानांतरण झाले आहे. मात्र ते गडचिरोलीत राहण्यास इच्छुक आहेत हे न समजणारे कोडे आहे. इलीयासुद्दीन यांचे त्वरित स्थानांतरण करावे, यासह इतरही पात्र अधिकाऱ्यांचे स्थानांतरण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्त्व दूरसंचान निगम एक्झिक्युटिव्ह असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष एस. आर. काळमेघ, एरिया सेक्रेटरी सचिन सरोदे, सीडब्ल्यूएस मेंबर टी. बी. वानखेडे, अध्यक्ष एस. आर. वट्टमवार, सेक्रेटरी किशोर कापगते यांनी केली. (नगर प्रतिनिधी)गडचिरोली जिल्ह्यात बदली झालेले नवीन अधिकारी रूजू झाले नाही. त्यामुळे जुन्या कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना सोडण्यात आले नाही, ज्या अधिकाऱ्याचे पर्यायी अधिकारी रूजू झाले आहेत. त्या अधिकाऱ्यांना सोडण्यात आले आहे. आपला रिलिव्हर आला नाही. त्यामुळे आपली बदली होऊनही गडचिरोली येथे थांबावे लागत आहे. आपल्या कार्यकाळापासून येथील बीएसएनएल अधिकाऱ्यांची दुकानदारी बंद झाली आहे. त्यामुळे ते आपल्याविरोधात नेहमीच उठाव करतात. - सय्यद इलीयासुद्दीन, जिल्हा अभियंता, बीएसएनएल, गडचिरोली