शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ब्रॉडबॅन्ड सेवेचे वाजले तीनतेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 22:45 IST

शहरातील ब्रॉडबॅन्ड सेवा मागील १५ दिवसांपासून सातत्याने विस्कळीत होत असल्याने याचा मोठा त्रास व्यापारी, शासकीय कार्यालये व अन्य ग्राहकांना बसत आहे. यामुळे बीएसएनएलचे ग्राहक कमालीचे त्रस्त झाले आहेत. परंतू समस्या नेमकी कुठे आहे आणि कशामुळे आहे याचे नेमके उत्तर ही सेवा देणाऱ्या खासगी एजन्सीसह बीएसएनएलच्या अधिकाºयांकडेही नाही. या समस्येचे खापर एकमेकांवर फोडून खासगी एजन्सीधारक आणि बीएसएनएलचे अधिकारी ग्राहकांना वेठीस धरत आहेत.

ठळक मुद्दे१५ दिवसांपासून ग्राहक त्रस्त : मंदगतीने कामांवर परिणाम, बीएसएनएलकडे उत्तरच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शहरातील ब्रॉडबॅन्ड सेवा मागील १५ दिवसांपासून सातत्याने विस्कळीत होत असल्याने याचा मोठा त्रास व्यापारी, शासकीय कार्यालये व अन्य ग्राहकांना बसत आहे. यामुळे बीएसएनएलचे ग्राहक कमालीचे त्रस्त झाले आहेत. परंतू समस्या नेमकी कुठे आहे आणि कशामुळे आहे याचे नेमके उत्तर ही सेवा देणाऱ्या खासगी एजन्सीसह बीएसएनएलच्या अधिकाºयांकडेही नाही. या समस्येचे खापर एकमेकांवर फोडून खासगी एजन्सीधारक आणि बीएसएनएलचे अधिकारी ग्राहकांना वेठीस धरत आहेत.सद्यस्थितीत बहुतांश कामे आॅनलाईन झाली असल्याने इंटरनेटशिवाय कोणतेही काम होत नाही. विशेष करून गडचिरोली शहरात जिल्हास्तरीय कार्यालये आहेत. तालुकास्तरावरून प्राप्त झालेली माहिती थेट मंत्रालयापर्यंत दरदिवशी पाठवावी लागते. पण इंटरनेट नसल्यास सर्वच कामे ठप्प होऊन जातात. मागील १५ दिवसांपासून गडचिरोली शहरातील इंटरनेट सेवा सातत्याने विस्कळीत होत आहे. कधीकधी इंटरनेट पूर्णपणे बंद होते, तर कधी इंटरनेटची गती अतिशय संथ राहाते. त्यामुळे एकही काम धड होताना दिसत नाही. त्यामुळे इंटरनेट वापरकर्ते त्रस्त झाले आहेत.साध्या ब्रॉडबॅन्डच्या तुलनेत ओएफसीची (आॅप्टीकल फायबर केबल) गती अधिक राहाते, असे सांगण्यात आल्याने काही खासगी कार्यालयांनी अधिकचे पैसे भरून खासगी एजन्टमार्फत ओएफसी केबल जोडून घेतले आहेत.मात्र इंटरनेच्या गतीमध्ये फारसा फरक पडण्याऐवजी वारंवार सेवे येणारे अडथळे वाढले असल्याचा अनुभव अनेक जण घेत आहेत. त्यामुळे ओएफसी सेवेविषयी सुध्दा ग्राहकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. अशा बोगस सेवेमुळे बीएसएनएलबाबत कमालीचा संताप व्यक्त केला जात आहे.खासगी आॅपरेटरचेही नेटवर्क ढेपाळलेबीएसएनएलच्या सेवेवर बोटे मोडत काही ग्राहकांनी खासगी संस्थांचे सीमकार्ड खरेदी केले. काही दिवस मोफत सेवा दिल्याने मोठ्या प्रमाणात ग्राहक जोडले. परंतू ज्या तुलनेत ग्राहक वाढले, त्या तुलनेत नेटवर्क सक्षम झाले नाही. त्यामुळे क्षमतेपेक्षा अधिक वाढलेल्या ग्राहकांना सेवा देताना खासगी आॅपरेटरची सेवा कोलमडत चालली आहे. विशेष करून सायंकाळी मोबाईलची इंटरनेट सेवा ठप्प पडते. त्यामुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. अनेकांनी मोफत डेटा देणाºया कंपनीला रामराम ठोकत इतर कंपन्यांना पसंती दर्शवित आहेत.शेकडो लँडलाईन फोन झाले ‘डेड’शहरातील मुख्य मार्गावर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी केलेल्या खोदकामात बीएसएनएलचे अनेक केबल तुटले आहेत. त्यामुळे शहरातील शेकडो लँडलाईन फोन गेल्या १५ दिवसांपेक्षा अधिक काळापासून बंद पडले आहेत. बहुतांश फोन सरकारी कार्यालयांमधील असल्यामुळे आपल्या कामासाठी फोन करणाºया सामान्य नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. परंतू हे फोन कधी सुरू होणार याची शाश्वती बीएसएनएलचे अधिकारीही देऊ शकत नाहीत.