शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटिशकालीन विश्रामगृह दुरवस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 22:29 IST

अहेरी तालुक्यातील वेलगूर टोला येथे १९२७ मध्ये ब्रिटिशांनी विश्रामगृहाची निर्मिती केली. मागील ९० वर्षांपासून विश्रामगृह स्थित आहे. परंतु या विश्रामगृहाच्या देखभालीकडे वन विकास महामंडळ (एफडीसीएम)चे दुर्लक्ष होत असल्याने सध्या विश्रामगृहाची दुरवस्था झाली आहे.

ठळक मुद्देवनविकास महामंडळाचे दुर्लक्ष : वेलगूर टोला येथे ९० वर्षांपूर्वी झाली निर्मिती

लोकमत न्यूज नेटवर्कवेलगूर : अहेरी तालुक्यातील वेलगूर टोला येथे १९२७ मध्ये ब्रिटिशांनी विश्रामगृहाची निर्मिती केली. मागील ९० वर्षांपासून विश्रामगृह स्थित आहे. परंतु या विश्रामगृहाच्या देखभालीकडे वन विकास महामंडळ (एफडीसीएम)चे दुर्लक्ष होत असल्याने सध्या विश्रामगृहाची दुरवस्था झाली आहे.वेलगूरपासून दोन किमी अंतरावर असलेल्या वेलगूर टोला येथे १९२७ मध्ये इंग्रजांनी विश्रामगृहाची निर्मिती केली. स्वातंत्र्यानंतर वन विकास महामंडळाकडे विश्रामगृहाच्या देखभालीची जबाबदारी आली. परंतु या विश्रामगृहाच्या देखभालीकडे दुर्लक्ष होत आहे. सध्या विश्रामगृहातील कवेलू, दारे, खिडक्या चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. विश्रामगृहासभोवताल वृक्ष-वेली वाढल्या आहेत. फरशीही पूर्णता फुटलेली आहे. परिसरात कचरा उगवला आहे. त्यामुळे ब्रिटिश काळापासून जपलेला वारसा नष्ट होतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. वन विकास महामंडळाने या विश्रामगृहाची दुरूस्ती व रंगरंगोटी करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.पर्यटनाला वाववेलगूर टोलापासून चार किमी अंतरावर जंगलात झिरकांबंडा नावाचे ठिकाण आहे. येथे मोठमोठ्यात दगडातून वर्षभर झरे वाहत असतात. त्यामुळे या स्थळाचा विकास केल्यास पर्यटनाला वाव मिळेल. तसेच ब्रिटिशकालीन विश्रामगृहाची दुरूस्ती झाल्यास बाहेरील पर्यटकांसाठी ही आकर्षणाचे स्थळ निर्माण होईल, पर्यटनस्थळ म्हणून विकास झाल्यास स्थानिकांना रोजगारही मिळेल.