शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

झुरी नाल्याच्या पुलाला भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 23:49 IST

एटापल्ली-जारावंडी मार्गावर असलेल्या झुरी नाल्याच्या दुरूस्तीवर मागील वर्षीच्या उन्हाळ्यात ४० लाख रूपये खर्च करण्यात आले. मात्र पहिल्याच पाण्यात झुरी नाल्याला मोठे भगदाड पडले आहे. यावरून काम निकृष्ट झाले असल्याचे स्पष्ट होत असून याची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

ठळक मुद्दे४० लाखांचा खर्च पाण्यात : चौकशीची होत आहे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : एटापल्ली-जारावंडी मार्गावर असलेल्या झुरी नाल्याच्या दुरूस्तीवर मागील वर्षीच्या उन्हाळ्यात ४० लाख रूपये खर्च करण्यात आले. मात्र पहिल्याच पाण्यात झुरी नाल्याला मोठे भगदाड पडले आहे. यावरून काम निकृष्ट झाले असल्याचे स्पष्ट होत असून याची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.एटापल्लीपासून १८ किमी अंतरावर देवदा ते हालेवारा या दोन गावांदरम्यान झुरी नाला आहे. एटापल्ली-कसनसूर-जारावंडी मार्गाने पुढे गडचिरोली, धानोरा व छत्तीसगड राज्यात जाता येते. या मार्गावर शेकडो गावे आहेत. या भागात कार्यरत शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्य सेवक याच मार्गाने गडचिरोली गाठतात. त्यामुळे जिल्हावासीयांसाठी सदर मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. मागील वर्षी झुरी नाल्यावर भगदाड पडले होते. एसटी किंवा जड वाहन गेल्यास सदर पूल कधीही कोसळून धोका होण्याची शक्यता होती. त्यामुळे मागील वर्षी एसटी बंद ठेवण्यात आली होती. परिणामी या भागातील नागरिक व विद्यार्थ्यांना फार मोठी अडचण निर्माण होत होती. ही बाब लक्षात घेऊन बांधकाम विभागाने पूल दुरूस्तीसाठी ४० लाख रूपये मंजूर केले. त्यातून पुलाची दुरूस्ती झाली. मात्र काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले. त्यामुळे पावसात पुलाच्या दोन्ही बाजुची माती खचून मोठमोठे खड्डे पडले आहेत. पुलाच्या आतील भागातील माती निघून गेल्याने या ठिकाणावरून जड वाहन केल्यास पूल कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्याचबरोबर इतर ठिकाणीही पुलाला अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत. पुलाची अवस्था अत्यंत वाईट आहे. त्यामुळे पुलाची दुरूस्ती करण्याऐवजी नवीन पूल बांधणे आवश्यक होते. मात्र बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुलाच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले. त्याचा परिणाम दिसून आला असून सहा महिन्यात ४० लाखांचा खर्च वाया गेला आहे. याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी आहे. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा