शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगेवरील पूल ठरतोय कर्दनकाळ

By admin | Updated: May 22, 2014 01:06 IST

आष्टी-गोंडपिपरी मार्गावरील वैनगंगा नदीवर असलेल्या पुलावरील लोखंडी कठडे अपघाताने तुटल्याने या पुलावर अपघात होण्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

आष्टी : आष्टी-गोंडपिपरी मार्गावरील वैनगंगा नदीवर असलेल्या पुलावरील लोखंडी कठडे अपघाताने तुटल्याने या पुलावर अपघात होण्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. पुलावरील कठडे तुटल्याने नेहमी अपघात घडत आहेत. त्यामुळे वाहनधारकांसाठी सदर पूल कर्दनकाळ ठरत आहे.

आष्टी-गोंडपिपरी मार्गावरील वैनगंगा नदीच्या पुलावरील लोखंडी कठडे ट्रक अपघातात तुटले. त्यामुळे पुलावरील ५ ठिकाणच्या कठडे तुटले आहेत. ४ ते ५ वेळा पुलावर अपघाताच्या घटना घडूनही याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहे. मागील वर्षी पुलावर इंडीका गाडीने दुचाकीला मागून धडक दिली. या अपघातात अहेरी येथील अभियंत्याची इंडीका कठडे तोडून नदीपात्रात कोसळली. यावर्षी पेपरमिल मध्ये लगदा घेऊन जाणारा ट्रक पुलावरील कठडे तोडून नदीपात्रात कोसळला. या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला. त्यानंतर एप्रिल महिन्यात उमरी येथून विठ्ठलवाडाकडे जाणार्‍या महेंद्रा पिकअप वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन कठडे तोडून नदीपात्रात कोसळले होते. यात चालक देवराव लडके याचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर मे महिन्यात आष्टी येथील पेपरमिलमधील कागद नेण्यासाठी बल्लारपूरवरून येत असलेला ट्रक नदी पुलावरून उजव्या बाजुला लोखंडी कठडे तोडून पात्रात कोसळला. यात चालक शिवकुमार कौर याचा ट्रकमध्ये दबुन जागीच मृत्यू झाला.

यंदा ३ महिन्यात चार गाड्या पुलाचे कठडे तोडून नदीपात्रात कोसळल्या. नदी पुलावर डाव्या बाजुला दोन ठिकाणी तर उजव्या बाजुला तीन ठिकाणी कठडे तुटलेले आहेत. त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना पुलावरून वाहन काळजीपूर्वक चालवावे लागत आहे. पुलावरून ऑटो, टॅक्सी व दुचाकी वाहनासहित अनेक वाहनांची रैलचैल असते. शिवाय चंद्रपूर जिल्ह्याची सीमा लागून असल्याने नेहमीच या मार्गावर वर्दळ असते. सदर पुलावर नेहमीच अपघात होत असतांनाही संबंधित विभाग कठडे लावण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे पुलावरील लोखंडी कठडे त्वरित सार्वजनिक बांधकाम विभागाने लावावे, अशी मागणी आष्टी येथील नागरिकांकडून होत आहे.