शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

पुलावर दगड टाकून बस केली मार्गस्थ

By admin | Updated: July 7, 2016 01:31 IST

अहेरी-पेंढरी-गडचिरोली बस प्रवाशांना घेऊन अहेरीवरून निघाली. मात्र देवदा व हालेवारा गावाच्या दरम्यान पुलावर पावसामुळे मोठा खड्डा पडला.

वाहक-चालकांचा पुढाकार : सार्वजनिक बांधकाम विभागाने जबाबदारी झटकलीअहेरी : अहेरी-पेंढरी-गडचिरोली बस प्रवाशांना घेऊन अहेरीवरून निघाली. मात्र देवदा व हालेवारा गावाच्या दरम्यान पुलावर पावसामुळे मोठा खड्डा पडला. यामुळे या बसच्या वाहक-चालकाने स्वत: पुढाकार घेऊन खड्ड्यात दगड टाकून रस्ता तयार केला. त्यानंतर येथून महामंडळाची सदर बस पुढे मार्गस्थ केली. सदर प्रकार शनिवारी घडला.अहेरी आगारातून एमएच-४०-६०४२ क्रमांकाची अहेरी-एटापल्ली-पेंढरी मार्गे बस गडचिरोलीसाठी सोडण्यात आली. चार दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने हालेवारा-देवदा मार्गावरील पुलावरून पाणी वाहून गेल्याने या पुलाच्या दोन्ही बाजूस मोठा खड्डा निर्माण झाला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक गेल्या अनेक दिवसांपासून बंद होती. अहेरीवरून गडचिरोलीसाठी निघालेली राज्य परिवहन महामंडळाची सदर बस हालेवारा-देवदाजवळ पोहोचल्यावर सदर परिस्थिती बस वाहक व चालकाच्या निदर्शनास आली. त्यानंतर बस वाहक परमेश्वर ईश्वर शेट्टी व चालक हनमंत पुल्लीवार यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मदतीने या पुलावर दगड टाकून कच्चा रस्ता तयार केला व त्यानंतर सदर बस पुढे मार्गस्थ केली. बसमधील प्रवाशांचे हाल होऊ नये, तसेच प्रवाशांचा वेळ व्यर्थ जाऊ नये, यासाठी इतरांची वाट न बघता आम्ही स्वत:च पुढाकार घेऊन दगड टाकून रस्ता तयार केला, असे या बसच्या वाहकाने सांगितले. बसमधील प्रवाशांनी बस वाहक व चालकाच्या या कामगिरीचे कौतुक केले. बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभारामुळे चालक-वाहकाला त्रास सहन करावा लागला. (प्रतिनिधी)ठेंगण्या पुलामुळे पावसाळ्यात अनेकदा अडथळाअहेरी-एटापल्ली-पेंढरी मार्गावर हालेवारा-देवदा दरम्यान नाल्यावर एक छोटा पूल आहे. मात्र सदर पूल ठेंगण असल्याने दमदार पावसाने या पुलावरून पाणी वाहते. परिणामी या मार्गावरील वाहतूक ठप्प होते. सदर पुलाची उंची वाढविण्यात यावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी सातत्याने लावून धरली आहे. मात्र याकडे प्रशासनासह शासनाचे व लोकप्रतिनिधीचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. यंदाच्या पावसाळ्यातही वाहतूक ठप्प होण्याचा धोका कायम आहे. वाहतूक ठप्प होऊन या भागातील अनेक गावांचा संपर्क तुटतो.