शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

मार्कंडादेव येथील पूल अर्धवटच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 00:45 IST

विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्यां चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथील वैनगंगा नदीपात्रातील पूल मागील ४७ वर्षांपासून अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील भाविकांना महाशिवरात्रीच्या यात्राकाळात मोठी कसरत करून मार्कंडेश्वराचे मंदिर गाठावे लागते.

ठळक मुद्दे४७ वर्ष उलटले : यात्रेदरम्यान भाविकांना कसरत करून गाठावे लागते मंदिर

संतोष सुरपाम ।लोकमत न्यूज नेटवर्कमार्कंडादेव : विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथील वैनगंगा नदीपात्रातील पूल मागील ४७ वर्षांपासून अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील भाविकांना महाशिवरात्रीच्या यात्राकाळात मोठी कसरत करून मार्कंडेश्वराचे मंदिर गाठावे लागते. कच्च्या स्वरूपाच्या रपट्यावरून भाविकांना यात्राकाळात धोकादायक प्रवास करावा लागतो. मात्र या गंभीर समस्येकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.मार्कंडादेव, साखरी घाटाला जोडण्यासाठी ४७ वर्षांपूर्वी मार्कंडादेव येथील वैनगंगा नदीपात्रात छोट्या पुलाच्या निर्मितीचे काम हाती घेण्यात आले. मात्र नदीपात्रात पुलाचे अर्धवटच काम करण्यात आले. गेल्या दशकापासूनच हा पूल अर्धवट स्थितीत आहे. मार्कंडादेव येथे होणाऱ्या महाशिवरात्रीनिमित्त अर्धवट पुलाचे काम पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.तिर्थस्थळ असलेला मार्कंडादेव येथे गेल्या काही वर्षांपासून प्रशासनातील मोठे अधिकारी व मंत्री महोदय तसेच लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने येतात . मात्र यापैकी एकानेही सदर पुलाचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून येते. यासंदर्भात मार्कंडादेव ग्रामपंचायत प्रशासनाने तालुका व जिल्हा प्रशासनाकडे अनेकदा निवेदन दिले. मात्र या निवेदनाची दखल घेण्यात आली नाही.दरवर्षी तयार होतो रपटाचंद्रपूर जिल्ह्यातील भाविकांना थेट मार्कंडादेव येथे येणे सोयीचे व्हावे, यासाठी वैनगंगा नदीपात्रात यात्राकाळात तात्पुरत्या स्वरूपाचा रपटा तयार केला जातो. मात्र हा रपटा पाण्याच्या प्रवाहाने वाहून जातो. त्यामुळे या ठिकाणी प्रशासनाला दरवर्षी रपटा तयार करावा लागतो. अर्धवट पुलाचे काम पूर्ण केल्यास रपट्यावरील खर्च वाचू शकतो.