शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
3
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
4
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
5
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
6
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
7
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
8
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
9
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
10
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
11
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
12
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
13
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
14
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
15
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
16
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
17
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
18
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
19
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
20
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग

काेराेनाकाळातही लाचखाेरी जाेरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:32 IST

शासकीय काम करून देण्यासाठी लाच मागणे व स्वीकारणे हा गुन्हा आहे. लाच मागणाऱ्या व स्वीकारणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी शासनाने स्वतंत्र ...

शासकीय काम करून देण्यासाठी लाच मागणे व स्वीकारणे हा गुन्हा आहे. लाच मागणाऱ्या व स्वीकारणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी शासनाने स्वतंत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची निर्मिती केली आहे. तक्रारकर्त्याकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर या तक्रारीची शहानिशा करून सापळा रचला जातो. एसीबीच्या वतीने नागरिकांमध्येे लाचलुचपत न देण्याविषयी जागृती केली आहे. त्यामुळे एखाद्या शासकीय कर्मचारी किंवा अधिकाऱ्याने लाच मागितल्यास त्याची तक्रार एसीबीकडे करण्याचे प्रमाण वाढले असले तरी त्यात पुन्हा वाढ हाेण्याची आवश्यकता आहे. काेराेनाकाळात अनेकांचा राेजगार गेला, व्यवसाय बुडाला, अनेक कंपन्या पूर्णपणे बुडाल्या; मात्र अशाही स्थितीत पाेलीस व आराेग्य विभागाचे कर्मचारी वगळता इतर शासकीय कर्मचारी व अधिकारी मजा भाेगत हाेते. घरी राहूनही पूर्ण पगार मिळत हाेता; मात्र अशाही स्थितीत या कर्मचाऱ्यांची लाचेची आस कमी झाली नाही. उलट मागील दाेन वर्षांच्या कालावधीत ती वाढली असल्याचे अटक केेलेल्या आराेपींच्या संख्येवरून दिसून येते. बाॅक्स तीन वर्षांमध्ये ४५ सापळे

मागील तीन वर्षांच्या कालावधीत सुमारे ४५ सापळे रचण्यात आले आहेत. त्यात ५९ आराेपींना अटक करण्यात आली आहे. २०१८ मध्ये १६ सापळ्यांमध्ये तेवढ्याच आराेपींना अटक करण्यात आली आहे. यात वर्ग-२ चे ४, वर्ग-३ चे १०, वर्ग-४ चे १ व इतर लाेकसेवक १ जणाला अटक करण्यात आली आहे. २०१९ मध्ये १४ सापळ्यांमध्ये २० जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात वर्ग-१ चा १, वर्ग-२ चे २, वर्ग-३ चे ११, इतर लाेकसेवक २ व खासगी ४ व्यक्तींचा समावेश आहेे. २०२० मध्ये १५ सापळे रचून २३ आराेपींना अटक करण्यात आली. त्यात वर्ग-२ चे ६, वर्ग-३ चे १२, वर्ग-४ चे १, इतर लाेकसेवक २ व दाेन खासगी व्यक्तींचा समावेश आहे.