लोकमत विशेषजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा गडचिरोलीकडे बीआरजीएफच्या कामाचा यावर्षीच्या सुरूवातीस ३ कोटी २८ लाख २५ हजार रूपयाचा निधी शिल्लक होती. केंद्र शासनाकडून सन २०१४-१५ या वर्षात २१ कोटी ८२ लाखाचा निधी प्राप्त झाला. इतर योजनेतून बीआरजीएफच्या कामासाठी १२.८४ लाख रूपयाचा निधी प्राप्त झाला. सदर सर्व निधी मिळून चालू वर्षात डीआरडीएकडे २६ कोटी ५२ लाख ८९ हजार रूपयाचा निधी होता. चालू वर्षात फेब्रुवारी अखेरपर्यंत बीआरजीएफच्या कामावर ९ कोटी ११ लाख ९९ हजार रूपयाचा निधी खर्च झाला असून याची टक्केवारी ३४.७७ आहे. जिल्ह्यात बीआरजीएफची १९ कामे पूर्ण झाली असून याची टक्केवारी ३.३५ आहे. विशेष म्हणजे, कुरखेडा तालुक्यातील सर्वाधिक ११ कामे पूर्ण झाली आहेत. अद्यापही सुरूवात न झालेल्या ३९४ कामांमध्ये अहेरी तालुक्यातील ६४, आरमोरी २०, भामरागड २१, चामोर्शी ५०, देसाईगंज १३, धानोरा ४०, एटापल्ली ३०, गडचिरोली ६०, कोरची १८, कुरखेडा ३१, मुलचेरा तालुक्यातील २४, सिरोंचा तालुक्यातील २३ कामांचा समावेश आहे. (स्थानिक प्रतिनिधी)९६ लाखांतून महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षणजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोन्नती अभियान राबविण्यात येते. या कार्यक्रमांतर्गत महिला बचत गटांचे सशक्तीकरण, सक्षमीकरण करण्यासोबतच कौशल्य विकास प्रशिक्षणही महिलांना दिले जाते. २०१३-१४ मध्ये या कार्यक्रमावर एकूण १ कोटी ४३ लाख १७ हजार रूपये खर्च करण्यात आले. विशेष म्हणजे, ९६ लाख रूपयांतून बचत गटांच्या महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात आले. स्वयंरोजगार योजनेवर ७३.७७ टक्के खर्च जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान राबविला जातो. याच अभियानांतर्गत सुवर्णजयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेची अंमलबजावणी केली जाते. सन २०१४-१५ या वर्षात डीआरडीएला २ कोटी ९४ लाख ३५ हजार रूपयाचा निधी प्राप्त शासनाकडून प्राप्त झाला. यापैकी फेब्रुवारी अखेरपर्यंत २१७.१६ लक्ष रूपये खर्च झाले असून खर्चाची टक्केवारी ७३.७७ आहे.
बीआरजीएफच्या ३९४ कामांचा शुभारंभच नाही
By admin | Updated: March 23, 2015 01:26 IST