शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

आष्टीतील रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 12:01 AM

१० जानेवारी रोजी झालेल्या अपघातात एका युवकाचा जीव गेल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची ताकीद दुकानदारांना दिली होती. अतिक्रमण हटविण्यासाठी १६ जानेवारीपर्यंत मुदत दिली होती. १७ जानेवारी रोजी दुकानदारांनी स्वत:हून अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करून दिला आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायतने हटविले अतिक्रमण : फळविक्रेत्यांनी लावली कठड्यांच्या आतमध्ये दुकाने; भाजीविक्रेतेही हटविले

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : १० जानेवारी रोजी झालेल्या अपघातात एका युवकाचा जीव गेल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची ताकीद दुकानदारांना दिली होती. अतिक्रमण हटविण्यासाठी १६ जानेवारीपर्यंत मुदत दिली होती. १७ जानेवारी रोजी दुकानदारांनी स्वत:हून अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करून दिला आहे.आष्टी हे गडचिरोली जिल्ह्यातील मध्यवर्ती शहर आहे. चामोर्शी, गोंडपिपरी, आलापल्लीवरून येणारे रस्ते आष्टीतील चौकात एकमेकांना मिळतात. तिनही मार्गावर बसथांबे आहेत. चंद्रपूर, आलापल्ली, चामोर्शी मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा फळ व इतर साहित्याची दुकाने लावण्यात आली आहेत. या दुकानांमध्ये येणारे दुकानदार रस्त्यावरच वाहने उभी ठेवतात. बरेचदा चामोर्शी व गोंडपिपरीवरून आलेली वाहने फळांच्या दुकानामध्ये शिरल्याने अपघात झाले आहे. १० जानेवारी रोजी फळांच्या दुकानाजवळ एक युवक दुचाकी वाहनावर बसून पाहुण्यांची वाट बघत होता. दरम्यान एका पीकअप वाहनाने चुकीच्या बाजूने येऊन दुचाकीला धडक दिली. यात त्या युवकाचा मृत्यू झाला. याच अपघातात चार जण जखमी सुद्धा झाले. याअगोदर चंद्रपूरवरून आलापल्लीकडे जाणाऱ्या ट्रकने एका शाळकरी मुलीचा बळी घेतला होता.येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात चारही मार्गाने येणारी वाहने, आष्टी शहरातील वाहने, शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी, पायदळ नागरिक व इतर प्रवाशी यांची नेहमी वर्दळ राहते. त्याचबरोबर छत्तीसगड राज्यातून येणाऱ्या ट्रेलरनेही बऱ्याचवेळा वाहतुकीची कोंडी होते. दुकानदारांनी रस्त्यावर अतिक्रमण केल्याने मार्ग अरूंद झाला आहे. त्यामुळे पायदळ जाणाºयालाही पुरेशी जागा राहत नाही. जीव मुठीत घेऊन या चौकातून प्रवास करावा लागतो. रस्त्यावर व्यापारी, ग्राहक व इतर नागरिकांची वाहने रस्त्यावरच उभी ठेवतात. ही वाहने हटविण्यासाठी वाहतूक पोलीस शिपायाने पुढाकार घेण्याची गरज आहे. काही दुकानदारांनी अतिक्रमण करून दुकान थाटले आहे. त्याचबरोबर समोर दुकानाएवढे शेडही उभारले आहे.या सर्व परिस्थितीमुळे आष्टी शहरात दरदिवशी लहान-मोठे अपघात होत असतात. अपघात होण्याची अनेक कारणे असली तरी अतिक्रमण हा त्यातील मुख्य कारण आहे.१० जानेवारी रोजी झालेल्या अपघातानंतर अतिक्रमण हटविण्याची मागणी जोर धरू लागली. ग्रामपंचायतीने सर्व फळविक्रेत्यांना नोटीस बजावून १६ जानेवारीपर्यंत अतिक्रमण हटविण्याची मुदत दिली होती. स्वत:हून अतिक्रमण न हटविल्यास ग्रामपंचायत कारवाई करून आपल्या पद्धतीने अतिक्रमण हटवेल, असा इशारा नोटीसमधून दिला होता. या नोटीसमुळे हादरलेल्या दुकानदारांनी १७ जानेवारी रोजी सकाळीच दुकाने हटविली. ही दुकाने कठड्याच्या आत लावली आहेत.पुन्हा अतिक्रमण न होण्याबाबत खबरदारी गरजेचीग्रामपंचायतीच्या नोटीसनंतर फळविक्रेत्यांनी १७ जानेवारी रोजी स्वत:हून दुकाने हटवून कठड्यांच्या मागे लावली. पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल, ग्रामविकास अधिकारी बारसागडे, यांच्या नेतृत्त्वातील पोलीस व ग्रामपंचायत कर्मचाºयांनी चौकात असलेली भाजीविक्रेत्यांची दुकानेही हटविली. चंद्रपूर मार्गावर ठेवण्यात येत असलेली अ‍ॅटो सुद्धा हटविण्याचे निर्देश दिले.अतिक्रमण हटवून काही दिवस झाल्यानंतर पुन्हा त्याच जागेवर दुकानदार आपले बस्तान मांडतात. हा अनुभव अनेकवेळा आष्टीवासीयांना आला आहे. त्यामुळे या ठिकाणी अतिक्रमण होणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. या परिसरात ग्रामपंचायतीने फलक लावावा, या फलकावर अतिक्रमण करणाºयांवर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्याचा इशारा द्यावा, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणgram panchayatग्राम पंचायत