शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाणी योजनेच्या नवीन कामांना ‘ब्रेक’

By admin | Updated: August 13, 2015 00:26 IST

ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम सुरू करण्यात आला होता.

विभागीय स्तरावरून आदेश झळकला : शासन राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम गुंडाळणार? दिलीप दहेलकर गडचिरोलीग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. त्यातून पाणी पुरवठ्याची योजना तयार केली जात होती. परंतु केंद्र शासनाने या कार्यक्रमातून नवीन कामे सुरू करू नयेत, असे आदेश दिले आहेत. त्यानुसार राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या प्रधान सचिवांचे पत्र जिल्हा परिषदेला प्राप्त झाले आहेत. केंद्र व राज्य शासन राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम गुंडाळण्याच्या विचारात आहे. परिणामी यापुढे ग्रामीण पेयजल कार्यक्रमातील पाणी योजनेच्या कामांना ‘ब्रेक’ लागणार आहे.सातत्याने टँकरने पाणीपुरवठा होत असलेल्या गावांमध्ये तसेच टंचाई असलेल्या गावांमध्ये नव्याने पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करणे, नादुरूस्त पाणीपुरवठा योजनांची दुरूस्ती, पाणी योजनेतून संबंधित गावांच्या हद्दीतील वाड्या-वस्त्यांना नव्याने पाणीपुरवठा करणे, कालावधी संपल्याने कालबाह्य झालेल्या पाणीपुरवठा योजना नव्याने दुरूस्त करण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून यासंदर्भातील कृती आराखडा तयार करून सदर आराखडा राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडे पाठविला जात होता. यंदा गडचिरोली जिल्हा परिषदेने कोट्यवधी रूपयांच्या पाणी योजनांच्या नव्या कामांचा आराखडा शासनाकडे सादर केला होता. यात बाराही तालुक्यातील एकूण २२५ कामांचा समावेश आहे.राज्याच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने केंद्र शासनाच्या आदेशानुसार यापूर्वी सुरू झालेली व यावर्षी प्रगतीपथावर असलेली तसेच तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधीत रखडलेली पाणी योजनांची कामे तातडीने पूर्ण करावीत, मात्र २०१५-१६ या वर्षाच्या कृती आराखड्यात समाविष्ट असलेली तसेच २०१४-१५ च्या आराखड्यात मंजूर असलेली परंतु अद्याप सुरू न झालेली पाणी योजनांची कामेही पुढील आदेश येईपर्यंत हाती घेऊ नये, असे जिल्हा परिषदेला कळविले आहे. फ्लोराईड बाधित व संसद आदर्श ग्राम योजनेतील गावात मात्र पाणी योजनांची कामे सुरू राहणार आहेत. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम योजनेतून आतापर्यंत अनेक गावात योजना राबविण्यात आल्या आहेत. अजूनही सदर योजना कार्यान्वित करण्याची ग्रामीण भागातून मागणी सुरूच आहे. मात्र यंदा आराखड्यातील व गतवर्षी मंजूर झालेली कामे सुरू करू नये, असे आदेश केंद्र व राज्य शासनाकडून देण्यात आल्याने राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना बंद होण्याच्या मार्गावर आहे.सदर महत्त्वकांक्षी योजना बंद झाल्यास ग्रामीण भागातील अनेक खेड्यांना पाणी योजनांच्या लाभापासून सध्यातरी वंचित राहावे लागणार आहे. गावाचा निर्णय गावानेच घ्यावा, या धोरणातून पेयजलासह अन्य महत्त्वाच्या योजना बंद करून १४ व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून थेट ग्राम पंचायतींना निधी देण्याचा प्रयत्न शासन करीत असल्याची चर्चा आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीस्तरावरून पाणी योजनेच्या कामात ढिसाळपणा व आर्थिक गैरव्यवहार होत असल्याच्या बाबीवरून सदर योजना बंद करून त्याऐवजी ग्रा. पं. ना थेट निधी देण्याच्या विचारात शासन आहे.