शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीमुळे निविदांवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 23:08 IST

१ जुलै २०१७ पासून देशात व राज्यात जीएसटीचा निर्णय घेण्यात आला असून जाचक अटी लादण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देनिर्णय होईपर्यंत आंदोलन कायम : कंत्राटदार संघटनेच्या पदाधिकाºयांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : १ जुलै २०१७ पासून देशात व राज्यात जीएसटीचा निर्णय घेण्यात आला असून जाचक अटी लादण्यात आल्या आहेत. या जाचक अटीमुळे बांधकाम व कंत्राटदार अडचणीत आले आहेत. यामुळे जुलै महिन्यांपासून गडचिरोली जिल्ह्यासह राज्यभरातील कंत्राटदारांनी कामांच्या निविदांवर बहिष्कार टाकला आहे, अशी माहिती शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत गडचिरोली जिल्हा कंत्राटदार असोसिशनच्या पदाधिकाºयांनी दिली.यावेळी माहिती देताना कंत्राटदार असोसिएशनचे अध्यक्ष दिलीप उत्तरवार यांनी सांगितले की, बांधकाम कंत्राटदारावार जीएसटी लादून कर वसूल केला जात आहे. मात्र अनेक बांधकामे जुने आहेत. या संदर्भात सरकारकडून कुठलीही स्पष्टता नाही. जुने काम सुध्दा जीएसटीच्या कचाट्यात सापडले आहेत. त्यामुळे कंत्राटदारांना आर्थिक नुकसान सहन करावी लागत आहे. त्यामुळे कंत्राटदारांनी रविवारपासून कोणतीही शासकीय बांधकामे करायचे नाही, असा निर्णय घेतला असून कामांच्या निविदाही भरण्यावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. एखाद्या कंत्राटदाराने निविदा जमा केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असेही उत्तरवार यांनी सांगितले.संघटनेचे सचिव आनंद श्रुंगारपवार यांनी कंत्राटदारांचा जीएसटीला विरोध नाही. मात्र जाचक अटीला विरोध आहे, असे सांगितले. शासनाकडून ठोस निर्णय होईपर्यंत कंत्राटदाराचा बहिष्कार सुरू राहिल, असे ते म्हणाले. यावेळी लक्ष्मण गद्देवार, महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्यासह गडचिरोली शहरासह जिल्ह्यातील अनेक कंत्राटदार उपस्थित होते.