शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

चार सदस्यांचा मासिक सभेवर बहिष्कार

By admin | Updated: December 31, 2015 01:30 IST

चामोर्शी पंचायत समितीच्या कारभारात व विकास कामात पं. स. सदस्यांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप करीत...

चामोर्शी पं. स. ची सभा रद्द : सदस्यांना विश्वासात घेत नसल्याचा बीडीओंवर आरोपचामोर्शी : चामोर्शी पंचायत समितीच्या कारभारात व विकास कामात पं. स. सदस्यांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप करीत पंचायत समितीच्या चार सदस्यांनी बुधवारच्या पं. स. च्या मासिक सभेवर बहिष्कार टाकला. त्यामुळे पंचायत समितीची मासिक सभा रद्द करण्यात आली. प्रमोद गोविंदा भगत, केशव मसाजी भांडेकर, नुमचंद पुरूषोत्तम भिवनकर व किरण मोतीराम कोवासे आदी चार पं. स. सदस्यांनी मासिक सभेवर बहिष्कार टाकला. चामोर्शी पंचायत समितीच्या सभापती शशिकला बंडू चिळंगे यांच्या अध्यक्षतेखाली पं. स. च्या प्रशिक्षण भवनात बुधवारी दुपारी १ वाजता सर्वसाधारण मासिक सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बांधकाम विभागाची कामे, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजना, शिक्षण विभाग, शालेय पोषण आहार योजना, सर्वशिक्षा मोहीम कार्यक्रम, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान आदींचा आढावा घेऊन आरोग्य, पशुसंवर्धन, कृषी आदी विभागाच्या योजनांवर चर्चा करण्यात येणार होती. मात्र पं. स. सदस्य प्रमोद भगत, केशव भांडेकर, नुमचंद भिवनकर व किरण कोवासे यांनी संवर्ग विकास अधिकारी बादलशहा मडावी हे पं. स. कार्यालयात वारंवार गैरहजर राहतात. तसेच पं. स. च्या विकास कामात सदस्यांना विश्वासात घेत नाही, असा आरोप केला. तसेच ग्रामसेवक व शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत आक्षेप घेऊन पंचायत समिती प्रशासनाचे ग्रामपंचायतीवर नियंत्रण नाही, असा आरोप करीत याबाबत विचारलेल्या प्रश्नांचे सभेत समाधानकारक उत्तर अधिकाऱ्यांकडून मिळाले नाही. त्यामुळे मासिक सभेवर बहिष्कार टाकत असल्याचे चार सदस्यांनी सांगितले.बहिष्कारामुळे पं. स. ची मासिक सभा रद्द झाल्याने तालुक्यातील विकास कामांवर चर्चा होऊ शकली नाही. सदर सभा पुढील महिन्यात घेण्यात येणार आहे. (शहर प्रतिनिधी)