शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

हरविलेला ‘तो’ मुलगा सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 00:11 IST

५ नोव्हेंबरपासून अचानक शाळा परिसरातून निघून गेलेला कोकडी येथील धनंजय नाकाडे आश्रमशाळेचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी प्रकाश अशोक मडावी (१६) हा शुक्रवारी सापडला.

ठळक मुद्देआजीकडे सुपूर्द : छत्तीसगडच्या मानपुरातून शिक्षकांनी घेतले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : ५ नोव्हेंबरपासून अचानक शाळा परिसरातून निघून गेलेला कोकडी येथील धनंजय नाकाडे आश्रमशाळेचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी प्रकाश अशोक मडावी (१६) हा शुक्रवारी सापडला. देसाईगंज पोलिसांच्या सहकार्यातून सदर शाळा प्रशासनाने या विद्यार्थ्याला छत्तीसगडच्या मानपूर येथून ताब्यात घेऊन त्याला देसाईगंजच्या पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर पोलिसांनी प्रकाशला मुरमाडी येथील आजीकडे सुपूर्द केले.प्रकाश मडावी हा ५ नोव्हेंबर २०१७ रोजी आश्रमशाळा परिसरातून देसाईगंज येथे सामान खरेदी करण्याच्या हेतूने निघून गेला. शाळा परिसरातून ट्रॅक्टरवर बसून तो भगतसिंग वार्डातून पुढे फवारा चौकात गेल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. याबाबत देसाईगंज पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलीस व आश्रमशाळा प्रशासनाच्या वतीने शोधमोहीम सुरू होती. दरम्यान जिल्ह्यातील प्रमुख गावांमध्ये त्याचा शोध घेण्यात आला. दरम्यान प्रकाशने भट्टेगाव येथील रहिवासी याच आश्रमशाळेतील विद्यार्थी मित्राला फोन करून पुराडा येथे भेटण्यासाठी सांगितले होते. २३ ते २६ नोव्हेंबरदरम्यान प्रकाश हा पुराडा येथेच मुक्कामी होता. भटेगावचा त्याचा मित्र आजारी असल्याने तो स्वगावीच होता. कोकडीच्या शाळेत परत आल्यानंतर प्रकाश हा शाळेतून निघून गेला असल्याचे त्याच्या मित्राला कळले. त्यावेळी त्याने शिक्षकांना प्रकाशशी आपले फोनवर बोलणे झाले असल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी कॉल डिटेल्स मागवून तपास सुरू केला. नेमक्या याचवेळी छत्तीसगडच्या मानपूर येथील प्रकाशची मोठीआई कुमारी मडावी यांनी वर्ग शिक्षक भोयर यांना फोन करून प्रकाश मानपूर येथे असल्याचे सांगितले. त्यानंतर ९ डिसेंबरला पोलिसांच्या मदतीने आश्रमशाळा प्रशासनाने प्रकाशला पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर त्याला मुरमाडी येथील आजी विमल मडावी यांच्याकडे सुपूर्द केले.