शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

काळी-पिवळीच्या धडकेत दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 22:49 IST

काळी-पिवळी वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे जण ठार झाल्याची घटना सोमनपल्ली गावाजवळ सोमवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देसोमनपल्लीजवळ अपघात : मृत विकासपल्लीतील रहिवासी

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : काळी-पिवळी वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे जण ठार झाल्याची घटना सोमनपल्ली गावाजवळ सोमवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली.प्रविण मंडल (३३), नयन बैरागी (३२) दोघेही रा. विकासपल्ली अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. एमएच ३३ एच ५००१ क्रमांकाचे काळी-पिवळी वाहन आष्टी येथून चामोर्शीकडे जात होते, तर चामोर्शीवरून आष्टीकडे दुचाकीस्वार येत होते. दरम्यान काळी-पिवळी व दुचाकी यांची कोनसरी-सोमनपल्ली या दोन गावादरम्यान जोरदार धडक झाली. या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. काळी-पिवळी वाहन चालकाने दोघांनाही वाहनात टाकून आष्टी येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी आणले, मात्र उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. आष्टी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहन चालकाने पोलीस स्टेशनमध्ये स्वत: जाऊन गुन्ह्याची माहिती दिली. पुढील तपास जयदेव पाटील करीत आहेत.घोटजवळच्या अपघातात दोघे जखमीघोट-चामोर्शी मार्गावरील गोलाबाई मंदिरापासून एक किमी अंतरावर सोमवारी रात्री ७ वाजताच्या सुमारास दोन दुचाकीची समोरासमोर धडक बसली. या अपघातात दोन्ही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. मुलचेरा पंचायत समितीमध्ये केंद्र चालक म्हणून कार्यरत असलेले छगण वैद्य रा. कुनघाडा हे एमएच ३३-४५५६ क्रमांकाच्या वाहनाने चामोर्शीकडे जात होते. तर एमएच ३३ एन ६८१६ क्रमांकाच्या दुचाकी वाहनाने महेश शेट्टे रा. कुंभारवाही हा चामोर्शीवरून घोटकडे येत होता. दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या धडकेत छगण वैद्य व महेश शेट्टे हे दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना चामोर्शी ग्रामीण रूग्णालयात भरती केले.