शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बोरमाळा नदी घाट मार्ग धुळीने माखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 00:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्हा मुख्यालयातील आठवडी बाजारातून बोरमाळा नदी घाटाकडे मार्ग जातो. वैनगंगा नदी पलीकडे बोरमाळा, विहिरगाव, गेवरा व सावली तालुक्यातील अनेक गावे आहेत. गडचिरोली हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने या भागातील अनेक नागरिक दररोज सदर मार्गाने गडचिरोलीकडे ये-जा करतात. मात्र बोरमाळा नदी घाटाकडे जाणारा रस्ता पूर्णत: धुळीने माखला ...

ठळक मुद्देधोकादायक खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता : सातत्याने मागणी होऊनही कामास मंजुरी नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्हा मुख्यालयातील आठवडी बाजारातून बोरमाळा नदी घाटाकडे मार्ग जातो. वैनगंगा नदी पलीकडे बोरमाळा, विहिरगाव, गेवरा व सावली तालुक्यातील अनेक गावे आहेत. गडचिरोली हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने या भागातील अनेक नागरिक दररोज सदर मार्गाने गडचिरोलीकडे ये-जा करतात. मात्र बोरमाळा नदी घाटाकडे जाणारा रस्ता पूर्णत: धुळीने माखला आहे. यामुळे सदर मार्गावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. परिणामी या मार्गावर अपघाताची शक्यता वाढली आहे.सदर मार्गावर नगर पालिकेच्या नळ योजनेचे जलशुध्दीकरण केंद्रही आहे. नदी काठावर इनटेक वेल व पाणी टाकी उभारण्यात आली आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्यात काही अडथळा निर्माण झाल्यास पालिकेचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी सदर मार्गानेच जाऊन नळ योजनेची समस्या जाणून घेतात. मात्र गडचिरोली पालिकेचेही सदर मार्गाच्या पक्क्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे. सध्या उन्हाळा असल्याने वैनगंगा नदी पलिकडील व गडचिरोली परिसरातील अनेक नागरिक थेट व सोयीचा मार्ग म्हणून याच मार्गाचा उपयोग करतात. मात्र सदर मार्गाची प्रचंड दुरवस्था झाल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसात गडचिरोली शहरातील अनेक युवक व नागरिक सदर वैनगंगा नदी घाटावर जाऊन आंघोळ करतात. काही लोक पोहण्याचा सरावही करतात. मात्र या मार्गाची दुरवस्था झाली असल्याने लोकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. सदर मार्गाची पक्की दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने होत आहे. मात्र प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी या मार्गाच्या दुरूस्तीकडे कमालीचे दुर्लक्ष केले आहे.भाजीपाला विक्रेते व मजुरांची पंचाईतवैनगंगा नदी पलिकडील बोरमाळा परिसरात अनेक शेतकरी भाजीपाला पिकाची लागवड करतात. गडचिरोली जिल्हा मुख्यालयाचा बाजार जवळ असल्याने आठवडी बाजाराच्या दिवशी तसेच दैनंदिन गुजरीतही हे शेतकरी व्यापाऱ्यांना भाजीपाला विक्री करतात. मजुरही याच मार्गाने येतात.