शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना बोनस रकमेचे वाटप

By admin | Updated: July 30, 2015 01:20 IST

सहकारी शेतकी खरेदी-विक्री समिती आरमोरीच्या वतीने सन २०१४-१५ या खरीप हंगामात खरेदी केलेल्या धानावर प्रती ...

२५० रूपये प्रतिक्विंटल : अरविंद पोरेड्डीवार यांच्या हस्ते वितरण कामाचा शुभारंभआरमोरी : सहकारी शेतकी खरेदी-विक्री समिती आरमोरीच्या वतीने सन २०१४-१५ या खरीप हंगामात खरेदी केलेल्या धानावर प्रती क्विंटल २५० रूपये प्रमाणे शेतकऱ्यांना बोनसचे वाटप करण्यात आले. सदर बोनस वितरणाचा कार्यक्रम बुधवारी आरमोरी येथील शेतकी खरेदी-विक्री संस्थेच्या कार्यालयात करण्यात आला. यावेळी सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार यांच्या हस्ते शेतकऱ्यांना बोनसचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशन मुंबई यांचे मार्फत आरमोरी सहकारी खरेदी-विक्री समितीच्या वतीने सन २०१४-१५ या पावसाळी खरीप हंगामात आधारभूत खरेदी योजनेंतर्गत एकूण १३ हजार १७७ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. खरेदी केलेल्या धानावर २५० रूपये प्रती क्विंटल प्रमाणे शासनाकडून संस्थेला एकूण ३२ लाख ९४ हजार ३०० रूपयांचा निधी प्राप्त झाला. बोनस वितरणाचा शुभारंभ सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार यांच्या हस्ते शंकरनगर येथील शेतकरी विश्वनाथ सोसी माझी यांना ९ हजार १०० रूपयांचा धनादेश देऊन करण्यात आला. यावेळी सहकारी खरेदी-विक्री समितीचे सभापती महेंद्र मने, उपसभापती लक्ष्मण कानतोडे, संचालक संजय हेमके, खिरसागर नाकाडे व संस्थेचे व्यवस्थापक गणपती मने आदी उपस्थित होते.सहकारी संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या धानावर बोनस देण्याची शासनाची योजना फायदेशिर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात खासगी व्यापाऱ्यांकडे धानाची विक्री न करता खरेदी-विक्री संस्थेकडे करावी, जेणे करून बोनसचा लाभ घेता येईल, असे प्रतिपादन अरविंद पोरेड्डीवार यांनी केले. याप्रसंगी एकूण ४०९ शेतकऱ्यांना बोनसचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खरेदी-विक्री सहकारी संस्थेचे कर्मचारी गोपाल कंकटवार, कार्तीक खेडकर यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)