शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

५० हजार तेंदू पुड्यांचा बोनस मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 01:32 IST

तालुक्यातील गर्कापेठा ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या पोचमपल्ली येथे २०१७ मध्ये तेंदूपत्ता संकलन करण्यात आले. तेंदू युनिटवर काम करणाºया चार खातेदारांनी चार गावातील तेंदू मंजुरांची ५० हजार तेंदूपुड्यांची नोंद बोनससाठी स्वत:च्या नावे करून घेतली होती.

ठळक मुद्देपोचमपल्ली येथे ग्रामसभा : चार मजुरांनी स्वत:च्या नावे परस्पर केली होती नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तालुक्यातील गर्कापेठा ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या पोचमपल्ली येथे २०१७ मध्ये तेंदूपत्ता संकलन करण्यात आले. तेंदू युनिटवर काम करणाºया चार खातेदारांनी चार गावातील तेंदू मंजुरांची ५० हजार तेंदूपुड्यांची नोंद बोनससाठी स्वत:च्या नावे करून घेतली होती. परंतु मजुरांच्या आक्षेपानंतर ग्रामसभेत ग्रामसेवकांनी संपूर्ण अहवाल वाचून दाखविल्यानंतर होणारा घोळ लक्षात आला. शेवटी जि. प. महिला व बालकल्याण सभापती जयसुधा जनगाम यांच्या निर्देशानुसार सदर बोनसची रक्कम मूळ मजुरांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे.पोचमपल्ली येथे आयोजित ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच विजया आसम होत्या. यावेळी जि. प. महिला व बालकल्याण सभापती जयसुधा जनगाम, पं. स. सदस्य शकुंतला जोडे, उपसरपंच वनिता कोरे, आविसं तालुकाध्यक्ष बानय्या जनगाम, राकाँचे तालुकाध्यक्ष मधुकर कोल्लुरी, पडाला, मारन्ना, गणेश बचलकुरा, पोलीस पाटील इप्पा श्रीनिवास, मारबार्इंना समय्या, तंमुस अध्यक्ष बिरा आत्राम, ग्रा. पं. सदस्य कुळमेथे शेखर, दासरी व्यंकटी, सुदर्शन गोमासी, बोल्ले शंकर, डोंगरे पेद्दाराजम, विरला समय्या, मारबाईना, तिरूपती, देब्बा स्वामी, पागडे गोपी, कोरते बकय्या, येलाकुची लिंगय्या, दीपेश चेन्नम उपस्थित होते.२०१७ च्या तेंदू बोनस वाटपात घोळ होत असल्याची तक्रार आविसं कार्यकर्त्यांनी जि. प. सभापती जनगाम यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत सभापतींनी सरपंच व ग्रामसेवकांना तेंदू बोनस वाटपाबाबत चर्चा करण्यासाठी विशेष ग्रामसभा घेण्याची सूचना केली होती. या सूचनेनुसार विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली.ग्रामसेवक बंडावार यांनी तेंदू वाटपाबाबतची माहिती ग्रामसभेदरम्यान वाचून दाखविल्यानंतर तेंदू युनिटवर काम करणाºया चार खातेदारांनी तेंदू मजुरांची ५० हजार तेंदूपुड्यांची परस्पर स्वत:च्या नावाने रजिस्टरला नोंद करून घेतली. सदर तेंदूपुड्यांची बोनसची रक्कम हडपली जाणार होती. परंतु ग्रामसभेत तेंदू बोनस वाटपाचा लेखाजोखा ग्रामसेवकांनी मांडल्यानंतर सदर बाब उघडकीस आली. बोनसची रक्कम परत तेंदू मजुरांच्या खात्यात जमा करावी. संबंधित तेंदू फळीतील चार खातेदार या सूचनेचे पालन करणार नसतील तर त्यांची तक्रार पोलीस ठाण्याला करावी, असे निर्देश जि. प. महिला व बालकल्याण सभापती जनगाम यांनी ग्रामसेवक बंडावार यांना दिले.जि. प. महिला व बालकल्याण सभापती जयसुधा जनगाम यांच्या पुढाकाराने ५० हजार तेंदूपुड्यांची बोनसची रक्कम चार गावातील तेंदू मजुरांना मिळणार असल्याने मजुरांनी समाधान व्यक्त केले आहे. ग्रामसभेमुळे तेंदूफळीवरील चार खातेदारांकडून तेंदूमजुरांना लुटण्याचा झालेला प्रयत्न उघडकीस येऊन तो विफल झाला.