शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
3
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
4
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
5
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
6
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
7
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
8
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
9
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
10
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
11
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
12
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
13
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
14
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
15
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
16
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
17
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
18
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
19
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
20
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!

बोम्मावार बंधू दोन दिवसात होणार न्यायालयात हजर

By admin | Updated: April 8, 2015 01:09 IST

गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी विकास विभाग व सामाजिक न्याय विभागाकडून कोट्यवधी रूपयांची शिष्यवृत्ती लाटल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी विकास विभाग व सामाजिक न्याय विभागाकडून कोट्यवधी रूपयांची शिष्यवृत्ती लाटल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणात आरोपी असलेले विद्याभारती कॉलेज आॅफ टेक्नॉलॉजी व राहुलभाऊ बोम्मावार कॉलेज आॅफ टेक्नॉलॉजीचे संचालक रोहित बोम्मावार व सूरज बोम्मावार या दोघा आरोपींच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात विद्याभारती कॉलेज गडचिरोलीच्या प्रकरणात दाखल केलेला बेल अर्ज मंगळवारी मागे घेतला व दोन दिवसांत चामोर्शी तालुका न्यायालयात हजर होण्यासाठी वेळ मागितला आहे, अशी माहिती विशेष तपास अधिकारी पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली. नागपूर येथील उच्च न्यायालयात सोमवारपासून सात आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे. मंगळवारी दोन्ही पक्षांच्या वतीने युक्तीवाद दिवसभर चालला. तसेच लेखा अधिकारी मनोजकुमार मून, तत्कालीन प्रकल्प अधिकारी दिगांबर मेंडके , सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक समाजकल्याण आयुक्त तुकाराम बरगे यांच्या जामीन अर्जावर युक्तीवाद पूर्ण झाला. याशिवाय अ‍ॅस्पायर शिक्षण संस्थेचा संचालक शाहाबाज हैदर, शिवनेरी शिक्षण संस्थेचा संचालक विघ्नोज राजुरकर यांच्या जामीनावर बुधवारी उच्च न्यायालयात युक्तीवाद होणार आहे. सध्या पोलीस यंत्रणा फरार आरोपींच्या मागावर आहे. (प्रतिनिधी)