शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

बोलेरोची बसला धडक

By admin | Updated: May 22, 2017 01:29 IST

आलापल्ली-सिरोंचा मार्गावरील उमानूर गावापासून एक किमी अंतरावर बेजुरपल्लीवरून जिमलगट्टा येथील

उमानूरजवळील घटना : एक ठार, एक गंभीर, सात प्रवासी जखमी लोकमत न्यूज नेटवर्क अहेरी : आलापल्ली-सिरोंचा मार्गावरील उमानूर गावापासून एक किमी अंतरावर बेजुरपल्लीवरून जिमलगट्टा येथील आठवडी बाजारासाठी प्रवासी घेऊन येत असलेल्या बोलेरो वाहनाने उभ्या बसला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. अन्य सात प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत. मृतक इसम बेजुरपल्ली येथील उपसरपंच आहे. सदर घटना रविवारी दुपारी सकाळी ११ ते १२ वाजताच्या सुमारास घडली. पोचा कुले गावडे (४५) असे मृतकाचे नाव असून ते बेजुरपल्ली येथील उपसरपंच होते. राजेश रोशन दुर्गे (३७) रा. मरपल्ली हा गंभीर जखमी आहे. तर किरकोळ जखमींमध्ये लक्ष्मी ढुरके (५०) रा. बेजुरपल्ली, लक्ष्मी इरपा मडे, सोनी बका वेलादी (२२), सिरीया पेंटा वेलादी (२५), शंकर दुरार्पा अटेला (४५), कुले रामा वेलादी (५०), तुंगी व्यंकटेश मडावी सर्व रा. बेजुरपल्ली यांचा समावेश आहे. प्राप्त माहितीनुसार बोलेरो वाहन क्रमांक एमएच ३३ जी १३२९ ने बेजुरपल्ली येथून काही नागरिक जिमलगट्टा येथील आठवडी बाजारासाठी येत होते. दरम्यान उमानूरपासून एक किमी अंतरावर एमएच ४० एक्यू ६०७१ क्रमांकाची बस उभी होती. चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहनाची बसला मागून जबर धडक बसली. यामध्ये एक जण जागीच ठार झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या वाहनात २५ ते ३० प्रवासी बसले होते. जिमलगट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पांढरे, सिरोंचा येथील १०८ रूग्णवाहिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जयस्वाल, आष्टी येथील डॉ. कटरे यांनी १०८ च्या रूग्णवाहिकेने घटनास्थळी दाखल होऊन उपचार केले. घटनास्थळावर पाहणाऱ्या नागरिकांची गर्दी झाली होती. अपघातांची मालिका सुरूच ४मागिल काही दिवसांपासून आलापल्ली-सिरोंचा मार्गावर अपघातांची मालिका सुरू असून अनेकांनी प्राण गमावले आहे. मागिल काही दिवसांपूर्वी याच मार्गावर एका महिंद्रा मॅक्स आणि टकची धडक होवून ६ जण ठार झाले होते. तसेच उमानूर पहाडीवर तेंदूपत्ता मजूरांना घेवून जाणारी टॅव्हल्स व ट्रक उलटून अनेकजण जखमी झाले.