शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षा समारंभाच्या स्मृतींना उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 23:57 IST

येथील दीक्षा भूमीवर हजारोच्या संख्येत धम्मचक्र प्रवर्तन दिनाला जनसागर उसळला. सम्राट अशोकानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्थात लाखो अनुयायांसमवेत बौद्ध धम्माची दीक्षा घेणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महापुरूष ठरले.

ठळक मुद्देदेसाईगंजात उसळला जनसागर : कार्यक्रमात वक्त्यांनी आठवणी जागविल्या

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : येथील दीक्षा भूमीवर हजारोच्या संख्येत धम्मचक्र प्रवर्तन दिनाला जनसागर उसळला. सम्राट अशोकानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्थात लाखो अनुयायांसमवेत बौद्ध धम्माची दीक्षा घेणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महापुरूष ठरले. त्यांनी त्यांनी नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्यानंतर बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी देसाईगंज येथे लाखो अनुयायांना दीक्षा दिली. तेव्हापासून देसाईगंज येथील दीक्षाभूमी नावारूपास आली. अशा अनेक आठवणी जागवित वक्त्यांनी जुन्या स्मृतींना उजाळा दिला.देसाईगंज येथील दीक्षाभूमीत शनिवारी आयोजित धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्या निमित्त कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी पंचरंगी धम्म ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर बौद्ध वंदना घेण्यात आली. सायंकाळी विविध वॉर्डातून धम्म रॅली फिरविण्यात आली. त्यानंतर भंते कुणाल कीर्ती यांच्या अध्यक्षतेखाली बुद्धवंदना पार पडली. या कार्यक्रमानंतर ग्यानचंद जांभुळकर यांचा सामाजिक प्रबोधन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन आ. कृष्णा गजबे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी भंते कुणाल कीर्ती होते. प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष शालू दंडवते, डॉ. महेश पापडकर, इंजि. विजय मेश्राम, उद्धव खोब्रागडे उपस्थित होते.बाबासाहेबांच्या धम्म क्रांतीमुळे देशातीलच नव्हे तर जगातील शोषितांना न्याय मिळाला, असे प्रतिपादन आ. कृष्णा गजबे यांनी केले. देसाईगंज शहराच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून विकासकामे करताना दीक्षाभूमीलाही महत्त्व दिले जाईल, असे मनोगत शालू दंडवते यांनी व्यक्त केले. दरम्यान उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन सहसचिव जयश्री लांजेवार यांनी केले. तर आभार महिला समितीच्या सचिव ममता जांभुळकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक सम्यक जागृत बौद्ध महिला समितीच्या सदस्यांनी सहकार्य केले. या सोहळ्याला देसाईगंज तालुक्यातील शेकडो बौद्ध समाजबांधव उपस्थित होते.