शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चहाच्या नफ्यातून गरिबांना ब्लँकेट वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 00:52 IST

आलापल्ली येथील चहाचा व्यवसाय करणाऱ्या रियाज कुरेशी नामक युवकाने चहाच्या नफ्यातून गोळा झालेल्या रकमेतून ब्लँकेट खरेदी करून या ब्लँकेटचे गोरगरीब नागरिकांना वितरण केले.

ठळक मुद्देआलापल्लीच्या युवकाचा अनोखा उपक्रम : प्रत्येक कटमागील दोन रूपये टाकले पेटीत

लोकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली : आलापल्ली येथील चहाचा व्यवसाय करणाऱ्या रियाज कुरेशी नामक युवकाने चहाच्या नफ्यातून गोळा झालेल्या रकमेतून ब्लँकेट खरेदी करून या ब्लँकेटचे गोरगरीब नागरिकांना वितरण केले.रियाज कुरेशी या युवकाने प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी टी स्टॉलमध्ये एक बंद पेटी ठेवली होती. प्रत्येकी पाच रूपये कट चहा पैकी दोन रूपये या बंद पेटीत टाकात होता. तर उर्वरित तीन रूपये चहाचा खर्च म्हणून रियाज कुरेशी स्वत:कडे ठेवत होता. काही दिवसानंतर गावातील प्रतिष्ठीत नागरिकांसमोर बंद पेटी फोडण्यात आली. बंद पेटीतून प्राप्त झालेल्या रकमेत आणखी त्याने स्वत:च्या कमलाईमधील काही पैसे टाकून तत्काळ १० ब्लँकेट खरेदी केले. अहेरी येथील उपजिल्हा रूग्णालयातील गोरगरीब नागरिकांना रियाजने सदर ब्लँकेट वितरित केले. यावेळी डॉ. संजय उमाटे, ज्येष्ठ पत्रकार ए. आर. खान, फिरोज शेख, प्रशांत ठेपाल, ग्रा. पं. सदस्य आशिष झाडे, इसरार शेख, संतोष येनगंटीवार, राकेश कुंदोजवार आदी उपस्थित होते. रियाज कुरेशीचे हे कार्य इतर युवकांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.नागरिकांचाही प्रतिसादरियाज कुरेशीने सामाजिक बांधिलकी जोपासत नफ्याचे दोन रूपये बंद पेटीत टाकण्याची अनोखी संकल्पना सुरू केली. रियाजच्या या संकल्पनेला नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. सामाजिक कार्यात पैसा वापरला जात असल्याने नागरिकांनीही रियाज कुरेशीकडून चहा खरेदीला प्राधान्य दिले.