शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

गडचिरोली जिल्ह्यात भेंडाळा परिसरात फुलत आहे काळ्या तांदळाची शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 13:33 IST

भेंडाळा परिसरात असलेल्या मार्कंडादेव येथील पंकज पांडे या शेतकऱ्यानी प्रायोगिक तत्त्वावर एका एकर मधे काळ्या धानाची शेती करण्यास सुरुवात केली.

ठळक मुद्देमार्कंडादेवमधील शेतकऱ्याचा अभिनव उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: तांदूळ म्हटलं की पहिला आठवतो तो भात. भाताचे अनेक प्रकार आपण पाहतो, त्याचा स्वादही घेतो. आपल्या परिसरात असे अनेक प्रकारचे तांदूळ उत्पादित केले जातात. परंतु भेंडाळा परिसरात असलेल्या मार्कंडादेव येथील पंकज पांडे या शेतकऱ्यानी प्रायोगिक तत्त्वावर एका एकर मधे काळ्या धानाची शेती करण्यास सुरुवात केली. हा धान आपल्या परिसरात नवीन आहे म्हणून या शेतकऱ्यानी या धानाची बिजाई माजी आमदार रामकृष्ण मडावी यांच्या वैरागड येथल्या शेतातून आणली. या शेताला चामोर्शी तालुक्यातील कृषी अधिकारी यांनी आताच काही दिवसापूर्वी भेट दिली होती. या परिसरातल्या शेतकऱ्यांना हा कुतुहलाचा विषय बनत आहे.मोठमोठ्या शहरामधे काळ्या तांदळाची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. काबोर्हाइड्रेट युक्त असलेले हे काळे तांदूळ शुगर व हृदयरोग असलेल्या रुग्णांना खूप फायदेशीर आहे. काळे तांदूळ खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलचे प्रमाण देखील नियंत्रित करता येते. त्या तांदळामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असल्याकारणाने ते पचण्यास उपयुक्त असतात आणि सोबतच एंटीऑक्सीडेंट तत्त्व असल्याने ते डोळ्यांसाठी देखील उपयोगी ठरतात.सामान्य तांदळाच्या तुलनेमध्ये काळा तांदूळ शिजायला फार वेळ लागतो. कोरोना विषाणूविरुध्द रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी हा काळा तांदूळ फायदेशीर ठरतो.काळा तांदळापासून मिळणारे फायदेआरोग्य स्वस्थ व मजबूत ठेवण्यासाठी याचा फायदा होतो. या काळ्या तांदळामधील फायटोकेमिकल कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित ठेवते. हृदयामधील धमन्यांमध्ये अर्थोस्क्लेरोसिस प्लेक फर्मेशनची संभावना कमी करते, ज्यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकची संभावना कमी होते. लठ्ठपणा कमी करण्यासाठी काळे तांदूळ अतिशय फायदेशीर ठरतात.या तांदळामध्ये असलेल्या फायबरमुळे अन्नपचन व्यवस्थित होते. काळ्या तांदळामध्ये असलेल्या एंथोसायनिन नावाच्या एंटीऑक्सीडेंटमुळे कार्डियोवेस्कुलर आणि कैंसरसारख्या आजारापासून आपले संरक्षण करते. काळ्या तांदळामधील एंटीऑक्सीडेंट तत्व हे त्वचा व डोळ्यांसोबत बुद्धीसाठी देखील फायदेशीर असते.

 

टॅग्स :agricultureशेती