गडचिरोली : काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करण्याची घोषणा भारतीय जनता पक्षाने केली होती. भाजपच्या या अभियानाला गडचिरोली जिल्ह्याने शतप्रतीशत पाठिंबा दिला आहे. २००९ मध्ये काँग्रेसचा गड असलेला गडचिरोली जिल्ह्याचा बालेकिल्ला भाजपने उद्ध्वस्त केला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत गडचिरोली विधानसभा क्षेत्रात भाजपने मिळविलेल्या मताधिक्यामध्ये यावेळी विधानसभा निवडणुकीत तब्बल ७४१ मतांची भर घालत जिल्ह्यातील आरमोरी, अहेरी, गडचिरोली या तीनही विधानसभा क्षेत्रात भाजपने आपला झेंडा रोवला आहे. भाजपला पहिल्यांदाच गडचिरोली जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत ऐवढे मोठे यश मिळाले आहे. राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्या नाग विदर्भ आंदोलन समितीसोबत भाजपने लोकसभेत केलेली हातमिळवणी यामुळे अम्ब्रीशराव महाराज यावेळी विधानसभेत पोहोचू शकले. त्यांनी आपले काका राकाँ उमेदवार धर्मरावबाबा आत्राम यांचा पराभव केला. तर आरमोरी हा काँग्रेसचा बालेकिल्लाही पोरेड्डीवारांच्या भाजप प्रवेशामुळे उद्ध्वस्त झाला व येथे भाजपचे पाळेमुळे रोवण्यास आता सुरूवात झाली आहे.
भाजपला विक्रमी यश
By admin | Updated: October 19, 2014 23:37 IST