चामोर्शी : चामोर्शी पंचायत समितीच्या दुर्गापूर गणासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे रमेश दुर्गे ५३५ मतांच्या फरकांनी विजयी झाले आहेत. त्यांनी राकाँ-पीरिपा समर्थीत काँग्रेसचे उमेदवार निनाद देठेकर यांचा पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यात असलेली ही जागा भाजपने खेचून आणली. एकूण ४ हजार ४०१ वैध मतांपैकी रमेश दुर्गे यांना २ हजार ३९८ तर निनाद देठेकर यांना १ हजार ८६३ मते मिळाली. १४० मतदारांनी नोटाचा वापर केला. गुरूवारी सकाळी तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरूवात झाल्यानंतर लगेचच या पोट निवडणुकीच्या निकाल आला. निकाल घोषीत होताच उपविभागीय अधिकारी तळपादे यांनी विजयी उमेदवाराला प्रमाणपत्र प्रदान केले. यावेळी नायब तहसीलदार (निवडणूक) चडगुलवार, दहीकर आदी उपस्थित होते. विजयी उमेदवारासोबत आमदार डॉ. देवराव होळी, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील वरघंटे, माजी उपसभापती मनमोहन बंडावार, सभापती शशीबाई चिळंगे उपस्थित होते. भाजप उमेदवाराच्या विजयासाठी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या मार्गदर्शनात रामेश्वर सेलुकर, स्वप्नील वरघंटे, पं.स. सभापती शशीबाई चिळंगे, मनमोहन बंडावार, आनंद भांडेकर, दिलीप चलाख, जयराम चलाख, विनोद गौरकर, मंटूलाल हलदार, हरिदास टेकाम आदींनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
दुर्गापूर पंचायत समिती गणातून भाजपचे रमेश दुर्गे विजयी
By admin | Updated: July 3, 2015 01:40 IST