शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
2
जो पोलिसांना सापडला नाही, त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांना कसा शोधला?; समोर आली थरारक घटना
3
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
4
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
5
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
6
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
7
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
8
‘उडत्या’ मिनेल्ले फारुकीची पाकिस्तानात चर्चा; ठरली देशातील सर्वात युवा पायलट!
9
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
10
३०० बंधारे आणि छोटी धरणे काढली, चीनची ‘यांगत्सी’ जिवंत झाली, आपण ‘मुळा-मुठेला’ कोंडून मारणार?
11
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
12
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
13
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
14
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
15
संपादकीय : ओसाड गावची तोंडपाटीलकी! असंवेदनशील कृषिमंत्र्यांच्या वादांची मालिका
16
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
17
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
18
पंचाहत्तराव्या वर्षी निवृत्ती.. संघाचे ‘ठरले’? पण सरकारसाठी नियम वेगळे!
19
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
20
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन

भाजपची निकालात मुसंडी

By admin | Updated: November 8, 2015 01:28 IST

नऊ नगर पंचायत निवडणुकीचे निकाल शनिवारी जाहीर झाले. १५३ जागांपैकी ५० जागा जिंकून भाजपने निकालात मुसंडी मारली.

धानोरात अपक्ष : अहेरीत भाजप, चामोर्शीत काँग्रेस तर मुलचेरात राकाँला निर्विवाद यशगडचिरोली : नऊ नगर पंचायत निवडणुकीचे निकाल शनिवारी जाहीर झाले. १५३ जागांपैकी ५० जागा जिंकून भाजपने निकालात मुसंडी मारली. तर काँग्रेसने ३४ व राकाँ ३२ जागा जिंकल्या आहे. अहेरी नगर पंचायतीत भारतीय जनता पक्ष, चामोर्शीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तर मुलचेरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले आहे. धानोरा नगर पंचायत निवडणुकीत ललीत बरछा यांच्या नेतृत्वातील ग्राम विकास आघाडीला घवघवीत यश मिळाले आहे. जिल्ह्याच्या नगर पंचायत निवडणुकीचा कौल पाहू जाता सत्ताधारी भाजपसाठी हा निकाल चिंतेचा विषय आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांच्या आघाडीचा विचार करता काँग्रेसला ३४ व राकाँला ३२ अशा एकूण ६६ जागांवर या दोन पक्षांनी मुसंडी मारली आहे. तर राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजप-शिवसेना या दोन पक्षांचा विचार करता भाजपला ५० व शिवसेनेला १२ अशा ६२ जागा या पक्षाच्या पदरात पडताना दिसतात. सिरोंचा, एटापल्ली या अहेरी विधानसभा मतदार संघातील नगर पंचायतीवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी व आदिवासी विद्यार्थी संघ मिळून सत्ता स्थापन करू शकतात, अशी स्थिती आहे. भामरागड येथे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस हे दोन्ही पक्ष आघाडी करून आपले संख्याबळ १० वर नेऊ शकतात. त्यामुळे अहेरी वगळता भाजपला सत्ता स्थापनेसाठी उपविभागात बरीच कसरत करावी लागणार आहे. मुलचेरा नगर पंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसने ११ जागा जिंकून निर्विवाद यश मिळविले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराची धुरा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष परशुराम कुत्तरमारे यांनी सांभाळली होती. त्यांच्या नेतृत्वात पक्षाला हे यश मिळाले आहे. अहेरी क्षेत्राचा विचार करता भाजपला ३० तर राकाँला २९ जागा मिळाल्या आहेत. आरमोरी विधानसभा क्षेत्रात भाजप-शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली आहे. कुरखेडा येथे भाजपला अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळाले असून ७ जागांवर पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहे. कुरखेडात शिवसेनेचे प्राबल्य असताना सेनेला केवळ ५ जागा मिळाल्या आहे. काँग्रेसला येथे ३ जागा तर राकाँला १ जागा मिळाली आहे. येथे सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसची महत्त्वाची भूमिका राहू शकते. शिवसेना-भाजप युती झाल्यास ही नगर पंचायत युतीच्या ताब्यात जाईल. कोरचीत सेना-भाजप युती करूनच निवडणूक लढले. त्यामुळे या नगर पंचायतीत त्यांचाच सत्ता स्थापनेसाठी दावा राहील. एकूणच नगर पंचायत निकालाने सत्ताधारी पक्षाला ग्रामीण भागात जोरदार धक्का बसला आहे. भाजपचे एक खासदार व एक राज्यमंत्री व तीन आमदार असताना चामोर्शीसारख्या मोठ्या नगर पंचायतीत भाजपला काँग्रेसने प्रचंड तडाखा दिला. याशिवाय धानोरा नगर पंचायतीतही भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे गडचिरोली क्षेत्रात भाजपची पिछेहाट झाली आहे.