शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

काँग्रेसतर्फे भाजपप्रणित केंद्र व राज्य सरकारचा निषेध

By admin | Updated: July 25, 2016 01:31 IST

देशाच्या विविध भागात दलितांवर होत असलेल्या अत्याचाराबाबत संताप व्यक्त करीत रविवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी ....

 निदर्शने : दलितांवरील अत्याचार, वाढत्या महागाईचा मुद्दा गडचिरोली : देशाच्या विविध भागात दलितांवर होत असलेल्या अत्याचाराबाबत संताप व्यक्त करीत रविवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी यांच्या नेतृत्वात येथील इंदिरा गांधी चौकात निदर्शने केली व भाजपप्रणित केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाचा निषेध केला. गुजरातमध्ये गोहत्येवरुन दलितांवर अत्याचार झाले. मुंबईतही एका अल्पवयीन दलित मुलाची हत्या करण्यात आली. शिवाय मुंबईतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन पाडण्यात आले. यावरुन भाजप सरकारच्या काळात दलित सुरक्षित नसून, हे सरकार दलितांबाबत दुजाभाव करीत असल्याची टीका यावेळी डॉ.नामदेव उसेंडी व आंदोलनकर्त्यांनी केली. निदर्शनेदरम्यान काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपप्रणित सरकारच्या विरोधात नारेबाजी केली. भाजपप्रणित राज्य सरकारच्या काळात प्रचंड महागाई वाढली आहे. अहमदनगर येथील कोपर्डी गावात अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना झाली. या घटनेचा निषेध काँग्रेसने केला. या आंदोलनात काँग्रेसचे शहराध्यक्ष सतीश विधाते, उपाध्यक्ष नरेंद्र भरडकर, प्रदेश सचिव हसनअली गिलानी, लोकसभा क्षेत्र अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनिकांत मोटघरे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, विधानसभा अध्यक्ष अमोल भडांगे, काशिनाथ भडके, पांडुरंग घोटेकर, लता पेदापल्लीवार, कुणाल पेंदोरकर, प्रभाकर वासेकर, पंचायत समिती सदस्य अमिता मडावी, नगरसेविका पुष्पा कुमरे, तालुकाध्यक्ष शंकरराव सालोटकर, एजाज शेख, नंदू वाईलकर, पी. टी. मसराम, टिपले, डोंगरे, रामटेके, विवेक घोंगळे, अभिजीत धाईत, प्रशांत इंगोले, सिध्दार्थ बांबोळे, राकेश गणवीर, पंकज बारसिंगे, वसीम पठाण, गौरव अलाम, सुमीत सिडाम, प्रतीक बारसिंगे, शाहरूख पठाण, चैतन्य अर्जुनवार, हेमंत भांडेकर, बाळू मडावी, प्रतीभा जुमनाके, निशा खवले, कैलाश कारमेंगे, वजीम खान, राजू कुळमेथे, आशा मेश्राम, श्रीराम मडावी आदीसह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)