शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
4
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
5
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
6
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
7
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
8
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
9
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
10
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
11
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
12
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
13
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
14
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
15
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
16
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
17
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
18
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
19
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
20
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!

नगराध्यक्ष निवडणुकीत भाजपला धक्का

By admin | Updated: November 27, 2015 01:36 IST

गडचिरोली जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात कोरची, धानोरा, एटापल्ली, अहेरी व मुलचेरा येथे नगराध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक गुरूवारी पार पडली.

कोरचीत सेना-भाजप एकत्र : व्हीप जारी केल्यानंतर अहेरीत बदलावा लागला उमेदवार गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात कोरची, धानोरा, एटापल्ली, अहेरी व मुलचेरा येथे नगराध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक गुरूवारी पार पडली. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का लागला आहे. अहेरी वगळता कुठेही भाजपला नगराध्यक्ष पद मिळाले नाही. कोरचीत शिवसेना-भाजपची युती नगराध्यक्ष निवडणुकीतही अबाधित राहिली. एटापल्ली, मुलचेरा येथे राकाँचा नगराध्यक्ष विराजमान झाला. तर धानोरा नगर पंचायतीत अपक्षांनी कब्जा केला.पालकमंत्र्यांचे वास्तव्य असलेल्या अहेरी राजनगरीत भाजपने मतदानासाठी व्हीप जारी केला असताना व्हीपमध्ये नाव असलेल्या हर्षा ठाकरे यांची उमेदवारी ऐनवेळी बदलून प्राजक्ता सचिन पेदापल्लीवार यांना उमेदवार करण्यात आले व त्या सर्वानुमते निवडून आल्या. मात्र उमेदवारी बदलण्याची नामुष्की भारतीय जनता पक्षावर आली. अहेरी येथे नगराध्यक्ष पदासाठी प्राजक्ता पेदापल्लीवार यांना १९ सदस्यांनी अविरोध निवडून दिले. नगराध्यक्ष पदासाठी राकाँकडून उमेदवारी अर्ज भरणाऱ्या अर्चना विरगोनवार यांच्यासह राकाँ सदस्यांनीही पेदापल्लीवार यांनाच समर्थन दिले. तर उपाध्यक्ष पदी भाजपच्या अन्नपूर्णा सिडाम व राष्ट्रवादी काँग्रेसच्या शैलेश पटवर्धन यांच्यात लढत झाली. यात अन्नपूर्णा सिडाम यांना नऊ तर पटवर्धन यांना आठ मते मिळाली व अहेरीचा गड राखण्यात भाजपला यश आले. पिठासीन अधिकारी म्हणून एसडीओ दुर्वेश सोनवणे, तहसीलदार सत्यनारायण सिलमवार यांनी काम पाहिले. आरमोरी विधानसभा क्षेत्रातील कोरची नगर पंचायतीवर भाजप-शिवसेना युतीने आपला कब्जा कायम ठेवला आहे. या नगर पंचायतीची निवडणूक भाजप-शिवसेना हे दोन्ही पक्ष युती करून लढले होते. येथे शिवसेनेचे नसरूद्दीन भामानी नगराध्यक्ष पदी तर भाजपचे कमलनयन खंडेलवाल हे उपाध्यक्ष पदी विराजमान झाले आहेत. कोरची येथे शिवसेना-भाजपच्या यांच्या विरोधात काँग्रेस, राकाँ, अपक्ष यांची आघाडी झाली. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे नसरूद्दीन भामानी यांना नऊ तर काँग्रेसचे शामलाल मडावी यांना आठ मते मिळाली. उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपचे कमलनयन खंडेलवाल यांना नऊ तर अपक्ष हिरा राऊत यांना आठ मते मिळाली. एटापल्ली येथे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने आपली सत्ता कायम ठेवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरिता प्रसाद राजकोंडावार नगराध्यक्ष पदी तर काँग्रेसचे रमेश गंप्पावार उपाध्यक्ष पदी निवडून आले. राकाँच्या सरिता राजकोंडावार यांना ११ मते मिळाली. त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपच्या निर्मला कोंडभत्तुलवार यांना पाच मते मिळाली. यावेळी आविसच्या अपक्ष नगरसेवक किरण रघुनाथ लेकामी सभागृहात उशीरा पोहोचल्याने त्यांना मतदान करता आले नाही. तर उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे रमेश गंपावार यांनी भाजपचे दीपक सोनटक्के यांचा पराभव केला. गंपावार यांना १० तर सोनटक्के यांना सहा मते मिळाली. अपक्ष नगरसेवक रेखा गजानन मोहुर्ले यांनी सोनटक्के यांच्या बाजुने यावेळी मतदान केले. पिठासीन अधिकारी म्हणून बीडीओ एस. पी. पडघन व तहसीलदार संपत खलाटे यांनी काम पाहिले.धानोरा येथे ललित बरच्छा गटाच्या वर्षा महेश चिमूरकर या नगराध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी ललित बरच्छा हे निवडून आले आहे. १७ सदस्यीय धानोरा नगर पंचायतीत ललित बरच्छा गटाला नऊ जागा मिळाल्या आहे. गुरूवारी झालेल्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदावर विराजमान झालेल्या वर्षा चिमुरकर यांना १० तर त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपच्या लीना साईनाथ साळवे यांना सात मते मिळाली. तर उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत ललित बरच्छा यांना १० तर अपक्ष नरेश बोडगेलवार यांना सात मते मिळाली.मुलचेरा येथे नगराध्यक्ष पदासाठी राकाँचे सुभाष शामराव आत्राम यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष पद राकाँचे देवा रामदास चौधरी यांची बिनविरोध निवड झाली. सुभाष आत्राम यांना ११ तर भाजपचे दिलीप बाबुराव आत्राम यांना तीन मते मिळाली. तीन नगरसेवकांनी मतदान केले नाही. यामध्ये दोन काँग्रेस व एक अपक्ष नगरसेवकाचा समावेश आहे. पिठासीन अधिकारी म्हणून जी. एस. तळपादे यांनी काम पाहिले. यावेळी तहसीलदार अपाले, नायब तहसीलदार पठाण, गिरडकर उपस्थित होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)