शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

चामोर्शी तालुक्यातील ६९ पैकी ४४ ग्रामपंचायतीत भाजपाची सत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:47 IST

गडचिरोली भाजप जिल्हा अध्यक्ष किसन नागदेवे, डॉ. देवराव होळी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन चामोर्शी तालुक्यातील ग्रामपंचायतीवर भाजपाचे उमेदवार ...

गडचिरोली भाजप जिल्हा अध्यक्ष किसन नागदेवे, डॉ. देवराव होळी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन चामोर्शी तालुक्यातील ग्रामपंचायतीवर भाजपाचे उमेदवार मोठ्या प्रमाणात निवडून आले आहे. त्यामुळे तालुक्यात भाजपचे ४४ सरपंच विराजमान झाले आहेत. शिवसेना या पक्षाने कुठलेही काम न करता भाजपाच्या ग्रामपंचायत सदस्यांना एक कोटीच्या विकास कामाचा निधी मिळवून देऊ, अशी खोटी आश्वासने देऊन त्यांना भूलथापा देऊन त्या ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा झेंडा फडकल्याची माहिती पसरवून जनतेची व त्या सदस्यांची फसवणूक करीत असल्याचा आरोप, आ.डॉ. देवराव होळी व भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप चलाख यांनी केला.

बहादूरपूर, सुभाषग्राम, वायगाव, सिमुलतला, चापलवाडा या पाचही ग्रामपंचायती भाजपाच्या असताना त्या ठिकाणी शिवसेनेचा झेंडा फडकला याची खोटी माहिती वर्तमानपत्रात दिली असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या पाच ग्रामपंचायतीसह भाजपने ४४ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच, उपसरपंच विराजमान झाले असून आमदार होळी यांनी केलेल्या विकास कामावर विश्वास ठेवून महाविकास आघाडीला त्यांची जागा जनतेने दाखवून दिली, असल्याचे चलाख म्हणाले.