शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

मताधिक्य मिळताच भाजप कार्यालयात गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 01:14 IST

दिवसभर कार्यकर्त्यांनी गजबजून राहणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी मात्र सायंकाळी ४ वाजेपर्यंत शुकशुकाट होता. खासदार अशोक नेते कार्यालयात येतील या आशेने सायंकाळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा लवाजमा कार्यालयात पोहोचला.

ठळक मुद्देप्रत्येक फेरीनंतर वाढत गेला कार्यकर्त्यांचा उत्साह, पण मिरवणुकीअभावी हिरमोड

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दिवसभर कार्यकर्त्यांनी गजबजून राहणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी मात्र सायंकाळी ४ वाजेपर्यंत शुकशुकाट होता. खासदार अशोक नेते कार्यालयात येतील या आशेने सायंकाळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा लवाजमा कार्यालयात पोहोचला. जल्लोष करण्यासाठी बँडसुद्धा बोलविण्यात आला. मात्र रात्री उशिरापर्यंत निकाल जाहीर न झाल्यामुळे कार्यकर्ते व नागरिकांनी शेवटी घराची वाट धरली.भाजप व काँग्रेस यांच्यामध्ये अटीतटीचा सामना होईल, असा अंदाज वर्तविला जात होता. त्यामुळे निकालाच्या दिवशी सकाळी भाजप कार्यकर्त्यांच्या चेहºयावर चिंता दिसून येत होती. ग्रामीण भागातून आलेले कार्यकर्ते थोडावेळ भाजप कार्यालयात थांबत होते. त्यानंतर ते थेट मतमोजणी केंद्राकडे निघत होते. सकाळी १०.२० वाजता पहिल्या फेरीचा निकाल घोषित होऊन, त्यामध्ये खासदार अशोक नेते आघाडीवर असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या चेहºयावर थोडेफार हास्य दिसून लागले. कार्यालयात बसलेले कार्यकर्ते फोनवरून प्रत्येक फेरीचा निकाल जाणून घेत होते. प्रत्येक फेरीत खासदार नेते आघाडी मिळवत असल्याचे बघून कार्यकर्तेही आनंदी होत होते.११ व्या फेरीचा निकाल सायंकाळी ४.१५ वाजता घोषित झाला. त्यामध्ये खासदार नेते यांना ६२ हजारांची आघाडी मिळाली. त्यामुळे त्यांचा विजय जवळपास निश्चित झाल्याने सायंकाळी ५ वाजतानंतर या कार्यालयात कार्यकर्त्यांची गर्दी जमा होण्यास सुरूवात झाली. कार्यालयाच्या मागे असलेल्या खुल्या जागेवर खुर्च्या लावण्यात आल्या.विजय निश्चित झाल्यानंतर खासदार नेते सायंकाळी कार्यालयात येणार होते. त्यामुळे आमदार डॉ.देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे आदी भाजप कार्यालयात पोहोचले. परंतू खासदार नेते मतमोजणीच ठिकाणावरून हलले नाही. खासदार अशोक नेते यांच्या विजयासाठी आपण कसकसे प्रयत्न केले, हे एकमेकांना सांगितले जात होते. काही कार्यकर्ते खासदार नेते हे निवडून येणारच होते, असेही सांगण्यास मागे-पुढे पाहत नव्हते. विजयोत्सव साजरा करण्यासाठी परवानगीही मागण्यात आली. परंतू पोलिसांनी आज बंदोबस्ताची मर्यादा पाहून उद्या मिरवणूक काढण्याचा सल्ला दिला.सकाळपासूनच पोलीस जवानांचा पहारानिकालाच्या दिवशी सकाळपासूनच गडचिरोली शहरातील वातावरण तंग असल्याने कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी भाजप कार्यालयात सकाळपासूनच पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अधूनमधून भेटी देऊनपोलीस विभागाचे अधिकारी सुरक्षेचा आढावा घेत होते. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल