शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सरकारने जनतेला देशोधडीला लावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 00:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क आरमोरी : चार वर्षांपूर्वी अच्छे दिनाचे गाजर दाखवून सत्तेत आलेल्या भाजप सरकारने जनतेला देशोधडीला लावले. सरकारच्या ...

ठळक मुद्देc

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : चार वर्षांपूर्वी अच्छे दिनाचे गाजर दाखवून सत्तेत आलेल्या भाजप सरकारने जनतेला देशोधडीला लावले. सरकारच्या चुकीचे निर्णय व धोरणामुळे सर्वसामान्यांंचा भ्रमनिराश झाला आहे, असा आरोप महाराष्टÑ प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव रवींद्र दरेकर यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.यावेळी माजी जि. प. सदस्य पी. आर. आकरे, ईश्वर कुमरे, विद्यमाने जि. प. सदस्य मनीषा दोनाडकर, श्रीनिवास आंबटवार, सुभाष सपाटे, विजय सुपारे, शालिक पत्रे, गणेश प्रधान, नंदू खानदेशकर आदी उपस्थित होते.यावेळी दरेकर म्हणाले, नोटबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था मोडकळीस आली. दीड कोटी लहान उद्योग व व्यापार डबघाईस आले आहेत. पेट्रोल, डिझेल व गॅस दर वाढीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. रोजगाराचा प्रश्न गंभीर होत असून खते व बि-बियाणांचे भाव वाढत आहेत. शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणाºया भाजप सरकारकडून जनतेवर विविध प्रकारचे टॅक्स व कर आकारले जात आहे. शेतकरी व जनतेच्या हिताविरोधी या सरकारची धोरणे आहेत. चार वर्षात या सरकारची कामगिरी काहीच नाही. मात्र जाहिरातबाजी मोठ्या प्रमाणात होत आहे. मनमोहनसिंग पंतप्रधान असताना शेतकºयांना डिझेलवर सबसिडी मिळत होती. मात्र ही सबसिडी आता बंद करण्यात आली आहे. टॅक्स लावा व पैसा वसूल करा, अशी निती या सरकारकडून अवलंबिली जात आहे. अनेक गंभीर प्रश्न या सरकारच्या काळात निर्माण झाले आहेत, असेही दरेकर यावेळी म्हणाले.वित्त आयोगाने राज्य शासनाचा अहवाल सादर केला. यामध्ये सन २०१० ते २०१४ या काळात १७ टक्के महसूल वसूल होत होता. मात्र आता या सरकारच्या काळात वसुलीची टक्केवारी १० टक्क्यावर आहे. हा अहवालसुद्धा सरकारने दाबून ठेवला आहे. गेल्या चार वर्षांत विद्यमान सरकारची कामगिरी शून्य असून या अपयशाचा जाब विचारण्याची वेळ आता आली आहे. अपयश झाकण्यासाठी राम मंदिराचा मुद्दा भाजप सरकारकडून पुढे आणला जात आहे, अशी टिका रवींद्र दरेकर यांनी यावेळी केली.रवी व मुल्लूर चक या गावाचे आरमोरी नगर परिषदेत समायोजन करण्यात आले नाही. त्यामुळे ही दोन्ही गावे बेवारस झाली आहेत. गावातील नागरिकांना दाखले मिळण कठिण झाले आहे. हा प्रश्न घेऊन आपण दिवाळीनंतर जिल्हाधिकाºयांची भेट घेणार आहोत, असे दरेकर यांनी सांगितले.