शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

जन्म-मृत्यू दाखला आता कोर्टातून

By admin | Updated: August 27, 2015 01:44 IST

जन्म-मृत्यू प्रमाणपत्र पूर्वी ग्राम पंचायत किंवा तहसीलदारस्तरावर दिले जात होते. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १७ डिसेंबर २०१३ रोजी दिलेल्या एका निर्णयामुळे ....

मुख्यमंत्र्यांकडे मागणी : तहसीलमधून मिळण्याची सुविधा लागू करागडचिरोली : जन्म-मृत्यू प्रमाणपत्र पूर्वी ग्राम पंचायत किंवा तहसीलदारस्तरावर दिले जात होते. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १७ डिसेंबर २०१३ रोजी दिलेल्या एका निर्णयामुळे आता जन्म-मृत्यू प्रमाणपत्र देण्याचे अधिकार प्रथम वर्ग न्यायिक दंडाधिकारी किंवा महानगर दंडाधिकारी यांना देण्यात आले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. या निर्णयाबाबत राज्य सरकारने त्वरित दुरूस्ती करून जुन्याच पद्धतीने हे प्रमाणपत्र वितरणाची व्यवस्था निर्माण करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते माणिकराव तुरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. या निवेदनात माणिकराव तुरे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रातील शेवटच्या टोकावर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात १२ तालुके आहेत. तालुका मुख्यालयापासून गावांचे अंतर ८० ते १०० किमीच्या परिघात येते. ग्रामीण भागात एखाद्या नागरिकाचा मृत्यू झाला. तर त्याच्या कुटुंबीयांना हे प्रमाणपत्र ग्राम पंचायतमार्फत घेऊन आपले काम भागविता येत होते. परंतु आता ग्राम पंचायत न्यायालयाच्या निकालामुळे असे प्रमाणपत्र वितरित करीत नाही. त्यामुळे त्यांना न्यायालयात यावे लागते. न्यायालयात वकीलाचा खर्च, कागदपत्रांचा खर्च व होणारा मानसिक त्रास व वेळही वाया जातो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी विधी मंडळात दुरूस्ती सूचना पारित करावी व जुन्याच पद्धतीने या प्रमाणपत्राचे वितरण कार्यकारी दंडाधिकारी यांच्यामार्फत करावे, अशी मागणीही तुरे यांनी केली आहे. अशी होती पूर्वीची पद्धतग्राम पंचायतमधून जन्म-मृत्यूचा दाखला घेतल्यावर तहसीलदारांकडे शपथपत्र दिल्यावर सदर दाखला संबंधितांना दिला जात होता. मात्र आता एक वर्षापूर्वी मृत्यू झाला असेल तर असे दाखले देण्याचा अधिकार प्रथम श्रेणी दंडाधिकारी यांना देण्यात आला आहे.