शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

सापळे लावून पक्ष्यांची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 22:29 IST

वैलोचना नदी पात्रात पाठणवाडा गावाजवळ सापळे लावून पक्ष्यांची शिकार केली जात आहे. सभोवतालचे पाणवठे आटल्याने तहानलेले पक्षी शिकाऱ्यांची शिकार बनत आहेत.

ठळक मुद्देजलसाठे आटले : वन विभागाच्या पाहणीत आढळले सापळे

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : वैलोचना नदी पात्रात पाठणवाडा गावाजवळ सापळे लावून पक्ष्यांची शिकार केली जात आहे. सभोवतालचे पाणवठे आटल्याने तहानलेले पक्षी शिकाऱ्यांची शिकार बनत आहेत.उन्हाळ्यात बहुतांश जलसाठे आटत असल्याने वन्यजीवांना नदीत पोहोचून आपली तहान भागवावी लागते. मर्यादीत जलसाठे राहत असल्याने या जलसाठ्यांवर पशु, पक्षी यांची मोठी गर्दी जमा होते. नदी परिसरातील पाणी जरी आटले असले तरी या ठिकाणी थंडावा राहत असल्याने बहुतांश पक्षी नदी किनाºयावर थांबतात. या पक्ष्यांना आपल्या जाळ्यात अडकविण्यासाठी शिकारी नदी पात्रात कृत्रिम पाणवठा तयार केला जात आहे. तहाणनेने व्याकुळ झालेले पक्षी पाणवठ्यावरचे पाणी पिण्यासाठी येतात. यावेळी त्यांना जाळ्यात अडकविले जाते. रोज शेकडो पक्ष्यांचे शिकार केली जाते. हा प्रकार वैरागड येथील वन कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर वैरागड येथील क्षेत्र सहायक जी. जी. लाखे व वनरक्षक विकास शिवनकर यांनी वैरागड वन परिक्षेत्रातील नदी, नाले, तलाव, बोड्यांची पाहणी केली. पाहणीदरम्यान वन्यजीवांची शिकार करण्यासाठी सापळे तयार करण्यात आले असल्याचे दिसून आल्याचे त्यांनी सांगितले. हे सर्व सापळे नष्ट करण्यात आले. वैलोचना नदी पात्रात सर्वाधिक सापळे रचण्यात आले होते.वन जीवांची तहान जंगलातच भागविण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध होतो. या निधीतून जंगलातच जलसाठे तयार करणे आवश्यक आहे. मात्र वन विभाग जलस्त्रोत बळकट करण्यासाठी खरच खर्च करतो काय, हा प्रश्न आहे.अशी केली जाते शिकारनदी पात्रात थोडा खोल खड्डा खोदून त्यामध्ये पाणी टाकले जाते किंवा एखादा नैसर्गिक खड्डा असला तरी त्या सभोवताल जाळे पसरविले जाते. खड्ड्यापासून काही दूर अंतरावर झाडाच्या फांद्यांची झोपडी तयार केली जाते. या झोपडीत शिकारी लपून बसतो. झाडाच्या फांद्यांची झोपडी तयार केल्याने सदर झोपडी पक्ष्यांच्या लक्षात येत नाही. झोपडीपासून जाळ्यापर्यंत दोरी बांधली जाते. पक्षी पाणवठ्यावर आल्यानंतर शिकारी जाळाची दोरी ओढतो आणि पक्ष्यांना अलगद फाशात अडकविले जाते. एका वेळेवर पाच ते सहा पक्षी जाळात अडकतात. दिवसभरात शेकडो पक्ष्यांची शिकार केली जाते. लावा, पारडी, टिटवी, चांभारकुकडी आदी पक्ष्यांची शिकार केली जाते.