शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

वडसा-गडचिरोली रेल्वेमार्गाच्या कामाचे आज भूमिपूजन

By admin | Updated: May 9, 2017 00:45 IST

५२.०५ किमी लांबीच्या वडसा-गडचिरोली या रेल्वे मार्गाच्या कामाचे भूमीपूजन ९ मे रोजी मंगळवारला सकाळी ११.१५ वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर आॅनलाईन पध्दतीने होणार आहे.

खासदारांची माहिती : नागपुरात कार्यक्रमाचे आयोजनलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ५२.०५ किमी लांबीच्या वडसा-गडचिरोली या रेल्वे मार्गाच्या कामाचे भूमीपूजन ९ मे रोजी मंगळवारला सकाळी ११.१५ वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर आॅनलाईन पध्दतीने होणार आहे. सदर कामाचे भूमिपूजन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय परिवहन व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती खासदार अशोक नेते यांनी सोमवारी सर्कीट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली.यावेळी खासदार अशोक नेते यांनी सांगितले की, वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गासाठी १६१ कोटी रूपये आपण केंद्र सरकारकडून खेचून आणले. राज्य सरकारनेही आपल्या ५० टक्के वाट्याच्या निधीची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. सदर मार्गाच्या भूमी अधीग्रहणाचे काम गतीने सुरू आहे. नागपूर येथे होणाऱ्या भूमिपूजन सोहळ्याला केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, वने व वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह विदर्भाच्या जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार, आमदार उपस्थित राहणार आहेत. याच ठिकाणी वर्धा-नागपूर, नागपूर-इटारशी, वर्धा-बल्लारशहा रेल्वेमार्गाच्या लाईनचे तसेच इतर विकासात्मक कामांचे भूमिपूजन होणार आहे, असेही खा. नेते यांनी सांगितले. वडसा-गडचिरोली रेल्वेमार्ग पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यात उद्योग वाढीस चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, नगराध्यक्ष योगीता पिपरे, प्रमोद पिपरे, स्वप्नील वरघंटे, जि.प. सदस्य मिना कोडाप, रेखा डोळस, जावेद अली हजर होते.