पोरेड्डीवार गटाचा एकतर्फी विजय : इंदिरा गांधी चौकात फटाके फोडून पोरेड्डीवार समर्थकांनी केला जल्लोषगडचिरोली : येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ओबीसी प्रवर्गातील एका जागेसाठी रविवारी पार पडलेल्या निवडणुकीत अरविंद पोरेड्डीवार गटाचे उमेदवार भैयाजी मारोती वाढई २४१ मतांनी विजयी झाले. विरोधी गटाचे उमेदवार अरुण मुनघाटे यांना पराभव स्वीकारावा लागला.दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार महर्षी अरविंद पोरेड्डीवार यांच्या गटाचे २१ पैकी २० संचालक यापूर्वीच अविरोध निवडून आले होते. आता भैयाजी वाढई यांच्या विजयाने पोरेड्डीवारांचे संख्याबळ वाढले असून जिल्हा बँकेवर त्यांचे वर्चस्व कायम राहणार आहे.यापूर्वी २१ पैकी २० जागांसाठी प्रत्येक गटातून एकच उमेदवार असल्याने त्यांना अविरोध विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले होते. त्यात सर्वच उमेदवार अरविंद पोरेड्डीवार गटाचे आहेत. अविरोध निवडून आलेल्या सदस्यांमध्ये मुरलीधर झंझाळ, डॉ.दुर्वेश भोयर, प्रा.पोपटराव तितिरमारे, खेमनाथ डोंगरवार, अनंत साळवे, अमोल गण्यारपवार, वासुदेव गेडाम, श्रीहरी भंडारीवार, इशांत पोरेड्डीवार, अरविंद पोरेड्डीवार, डॉ.बळवंत लाकडे, खुशाल वाघरे, जागोबा खेळकर, प्रंचित पोरेड्डीवार, प्रकाश पोरेड्डीवार, हिरालाल वालदे व बंडू ऐलावार, महिला गटातून मीराबाई नाकाडे व शशिकला देशमुख यांचा समावेश आहे.मात्र ‘र’ गटातून ओबीसी प्रवर्गातील उमेदवार निवडण्यासाठी भैयाजी वाढई व अरुण मुनघाटे या दोघांचे अर्ज असल्याने २६ एप्रिलला निवडणूक पार पाडली. सोमवारी सकाळी या निवडणुकीची मतमोजणी पार पडली. या निवडणुकीत भैयाजी वाढई २४१ मतांनी विजयी झाले. २५० मतांपैकी भैयाजी वाढई यांना २४५, तर अरुण मुनघाटे यांना केवळ ४ मते पडली. एक मत अवैध ठरले. त्यामुळे आता दि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर पोरेड्डीवार गटाची निर्विवाद सत्ता प्रस्थापित झाली आहे. पोरेड्डीवार समर्थकांनी येथील इंदिरा गांधी चौकात फटाके फोडून विजयाचा जल्लोष साजरा केला. (प्रतिनिधी)प्रमाणपत्राचे वाटपजिल्हा बँकेच्या एका जागेसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल १० वाजता घोषीत झाल्यानंतर विजय उमेदवार भैय्याजी वाढई यांना येथील ग्रामसेवक भवनात जिल्हा उपनिबंधक जयेश एस. आहेर यांच्या हस्ते विजयी प्रमाणपत्राचे वितरणही करण्यात आले. यावेळी बँकेचे कक्ष अधिकारी जी. के. नरड उपस्थित होते. अरविंद पोरेड्डीवार, आ. क्रिष्णा गजबे, प्रकाश पोरेड्डीवार यांचे चौकात स्वागत करण्यात आले.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भय्याजी वाढई विजयी
By admin | Updated: April 28, 2015 02:16 IST